पी पी ई किट व सी सी टी व्ही चित्रीकरण लावण्यासाठी जनआंदोलन उभारणार "; {जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांचा इशारा } तर करुणा धंनजय मुंढे घेणार आरोग्य मंत्र्याची भेट





                      मुंबई प्रतिनिधी / मालाड पश्चिम येथील रुग्ण शिवाजी वाघमारे वय ६५वर्ष हे . भारत रत्न  डॉ.बाबासाहेब  आंबेडकर, म .न पा . सर्वसाधारण  रुग्णालय कांदिवली पश्चिम मुंबई येथे अति दक्षता वैद्यकीय विभागात दिनांक १८\ मे/२०२१रोजी अचानक श्वसनाचा त्रास होत  छातीत  दुःखू  लागण्यामुळे दाखल  केले  असता  त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉसिटीव्ह आला  असल्यामुळे  मध्ये Micu.  मध्ये भरती केले  असता त्यांच्या छातीत संसर्ग  झाला  असल्याचे   एच आर सी  टी अंतर्गत   समजले मात्र त्यांची बी पी लेवल नॉर्मल  असून 98 ऑक्सिजन लेव्हल  आहे व ते हाताने जेवण करत आहेत आणि सध्या त्याना 12लिटर ओ टु वर ठेवले आहे .असे डॉक्टर देवेंद्र नी सांगितले मात्र  विशेष बाब आपल्या निदर्शनास आणून देतो की  या ठिकाणी काही रुग्ण  एक  महीन्यापासून  जीवन मरणाचा संघर्ष व्हेंटिलेटर च्या साह्याने जीवन घटका मोजत  असून  या ठिकाणी  सामान्य नागरिकांना  आत  प्रवेश  निषिद्ध  केला  हे  समजू  शकतो  मात्र  मी  माझ्या  डोळ्याने  बघितले   येथून प्रत्येक  रुग्णाचे  प्रेत  बाहेर  येत  असून  आत  शिकाऊ  डॉक्टर आहेत का?  याबाबत  काहीही नाही नाही  नर्स व  काळजी वाहू  मावशी  वॉर्ड बॉय रुग्णासोबत  कश्याप्रकारे वर्तन  करतात त्याना  काय  हवंय  काय  नाही  याची काहीही  माहिती नातेवाईकांना मिळत नाही  . आपल्या रुग्णाची माहिती  मिळणे संविधानिक व्यक्ती स्वातंत्र्य असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक सुद्धा जेवणाचा डब्बा देताना किमान काचेमधून सुद्धा बघण्यास मज्जाव करत मुजोरी करत असतात या घटनेमुळे नातेवाईकांमध्ये  तीव्र नाराजी चा सूर असून या घटनेमुळे संतप्त झालेले सुरेश वाघमारे यांनी थेट या  बाबत   मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्याकडे पी पी ई किट परिधान करून  रुग्णास भेट  घेण्याची परवानगी द्यावी  व सी सी टी व्ही द्वारें  चित्रीकरण करावे .कारण  रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्ण  भरती केल्यापासून रुग्ण  मूर्त प्रेत जाण्यापर्यंत आपल्या रक्ताच्या व्यक्तीशी  सवांद तर  सोडाच पण दफन होईपर्यंत साधा चेहरा सुद्धा बघाय मिळत नाही  कारण  यांच्यामुळे दुसऱ्याला पण  संसर्ग होईल हे सर्व  बरोबर आहे पण रुग्ण भेटीसाठी डॉक्टर नर्स प्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकाला सुद्धा  दिवसातून  किमान एकदा तरी  रुग्णाशी  सवांद साधण्यासाठी पी पी ई किट परिधान करून जाणे शक्य असून तशी परवानगी देण्यात यावी कारण  भेटीस येऊन  डॉक्टर रोजची  रुग्णाची माहिती  देतात तेव्हड्या वरच समाधान मानव लागत असून  आतमध्ये रुग्णासोबत  कश्याप्रकारे वागल्या जाते याची इतंभूत माहिती मिळत नाही .  विशेष रोष असा कि  आज सर्वत्र लसीकरण उपलब्ध आहे  रेमिडिसवीर इंजेकशन उपलब्ध आहेत कोरोनावर विविध औषधी उपाय उपलब्ध  असताना सुद्धा रुग्ण  येथे लगेच दगावतात कसे याबाबाबत तज्ञ् डॉक्टरांची  एक  शॅडो वॉच टास्कफोर्स समिती नेमण्यात यावी अश्याप्रकारे  खूप समस्या  रुग्णांच्या नातेवाईकाना आहेत  या बाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आजाद समाज पार्टी व जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेचे शिष्ट मंडळ  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटणार आहे. मात्र   तूर्तास तात्काळ पी पी  ई किट परिधान करून  रुग्णास भेटण्यास परवानगी देण्यात यावी अन्यथा आजाद समाज पार्टी  व जीवनज्योत सामाजिक सेवा संस्था च्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सुरेश वाघमारे यांनी दिला असून  आरोग्य प्रशासनाने या गंभीर बाबीची नोंद घ्यावी व आमची लोकहिताची   मागणी मान्य करून  तसे आदेश सपूंर्ण महाराष्ट्रातील रुग्णालयास देण्यात यावे अशी मागणी सुरेश वाघमारे अध्यक्ष उत्तर मुंबई जिल्हा आजाद समाज पार्टी यानी आपले सरकार वर व मुख्यमंत्री आणि  आरोग्य मंत्री यांना ईमेल द्वारे पत्र दिले आहे विशेष म्हणजे या   मागणीसाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंढे यांच्या पत्नी  आग्रही असून करुणा धंनजय मुंढे यांनी सुद्धा  या मागणीस पाठींबा दर्शविला असून लवकरच  याबाबत आजाद समाज पार्टी व  जीवनज्योत सामाजिक सेवा संस्था आरोग्य मंत्र्यांची भेट घेणार आहे असे  प्रसिद्धी माध्यमाद्वारे करुणा धंनजय मुंडे यांनी सांगितले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने