नाशिक शांताराम दुनबळे .
नाशिक-: चांदवड नगर परिषद येथे पाणी टंचाई व इतर अडचणींना जनतेला इन कोरोना काळात सामोरे जावे लागत आहे यासाठी चांदवड वरचे येथील भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा पदाधिकारी यांनी व वरचे गाव परिसरातील नागरीक यांनी तात्काळ कामे मार्गी लावावे यासाठी विनंती पुर्वक अर्ज केलेला आहे , चांदवड शहरात अनेक समस्या प्रलंबीत असून त्याकडे उघडउघड डोळेझाक होत असल्याने नागरीकांना ऐन कोरोना काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . त्याकरीता नागरिकांनी मागण्यात तातडीने पुर्ण कराव्यात ही विनंती . या मध्ये १ ) चांदवड शहरात गेल्या १०-१२ दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे तो नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा,mjp कडे पत्रव्यवहार करून सुरळीत पाणी पुरवठा करावा २ ) शहरातील बंद वॉटर एटीएम तात्काळ सुरू करावे . ३ ) पावसाळ्याच्या पुर्वी अपुर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्याच्या व गटारीचे काम पुर्ण करावे . ४ ) चांदवड शहरात रोगरागीचे व डेंग्युचे प्रमाण वाढल्याने लवकरात लवकर संपुर्ण परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात यावी . ५ ) शहरातील काही साधारणतः एक महिन्यापासून काही ठिकाणी स्ट्रीट बंद अवस्थेत असल्याने त्या तात्काळ सुरू कराव्यात . ६ ) मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा . ७ ) शहरातील गटारींची साफसफाई करण्यात यावी . ८ ) सध्या चांदवड येथील स्मशानभूमीत कोविड रूग्णांचा अंत्यविधी होत असल्याने अंत्यविधी झाल्यानंतर योग्य ती फवारणी करण्यात यावी .पाणी साचत असलेल्या ठिकाणी तात्काळ मुरूम राखण्यात यावे, तरी या सर्व तात्काळ या प्रकाराची दखल घेऊन वरील जनतेच्या हिताच्या मागण्या पुर्ण कराव्यात . याउपरही आपण कार्यवाही केली नाही तर तीव्र स्वरूपाचे व गांधीगिरी आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी व होणाऱ्या संपुर्ण परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे यावर भाजपा जिल्हा सरचिटणीस यु.मो.अंकुर कासलीवाल,भाजपा शहर अध्यक्ष मुकेश आहेर,महेंद्र कर्डीले,महेश बोराडे,निलेश काळे,किशोर क्षत्रीय,शिवाजी गवळी,वसीम कादरी आदी उपस्थित होते.
Tags
news