प्रतिनिधी विकी गवळी
चांदवड ता. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाज आक्रोश करतांना दिसत आहे. त्याअनुषंगाने धुळे दौऱ्यावर असलेले आमदार नितेश राणे यांनी चांदवड येथे भेट दिली असता सकल मराठा समाज चांदवड तालुक्यातील नेत्यांची भेट घेतली, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करावे व SEBC कोट्यातील वैधकीय प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयात केस सुरू असून येत्या ७ जूनला सुनावणी आहे याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यावेळी पप्पू कोतवाल, जिल्हाध्यक्ष जितू कोतवाल, दीपक हाडंगे, रोशन गांगुर्डे, सचिन शिंदे, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते
Tags
news
