चांदवाडला नाले साफसफाई होणे गरजेचे




प्रतिनिधी विकी गवळी

चांदवड: शहरात सध्या अनेक समस्या निर्माण झालेल्या असून चांदवड नगरपरिषद अधिकारी मात्र याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. बस स्टँड शेजारून जाणारा नाला अतिशय अस्वच्छ असून झाडेझुडपे वाढेलली आहेत.गुजराथी नगर पुढील पुलाच्या शेजारून वाहणारा नाला सुद्धा अश्याच अवस्थेत आहे.नागरी वस्ती जवळच असल्याने नगरपरिषद ने नाले साफसफाई पावसाळा सुरू होण्याच्या आत करणे गरजेचे आहेत ही आशा नागरिक व्यक्त करीत आहेत.
मार्केट यार्ड शेजारील गुरुकुल कॉलनी व महालक्ष्मी नगर परिसरात शंकराचे मंदिर असून त्या जवळून वाहणारा नाल्याचा अतिशय घाणेरडा वास येत असल्याने स्वच्छता होणे गरजेचे आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने