रत्नागिरी: 5 अख्खा आदिवासी संघटना बिरसा क्रांती दलात येणार असल्याचा गोप्यस्फोट सुशिलकुमार पावरा युवा राज्याध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी केला आहे. सुशिलकुमार पावरा यांनी बिरसा क्रांती दलाची राज्याध्यक्ष युवा आघाडी महाराष्ट्र ची धूरा हाती घेतल्यानंतर लगेच गाव तेथे शाखा तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला राज्यभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बिरसा क्रांती दलाच्या गाव शाखा, तालुका शाखा , जिल्हा शाखा तयार करण्याचा जणू सपाटाच सुरू झाला आहे. युवा वर्गाच्या पुढाकाराने बिरसा क्रांती दल संघटना झपाट्याने वाढत आहे.युवा वर्गाच्या सामाजिक कामाने लोक प्रभावित होत आहेत व स्वत: हून बिरसा क्रांती दल संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
गाव , तालुका व जिल्हा शाखा तयार करण्याच्या टिममध्ये मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख , रोहित पावरा नाशिक विभाग उपाध्यक्ष, राजेंद्र पाडवी जिल्हा अध्यक्ष सांगली,वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे,साहेबराव कोकणी जिल्हाध्यक्ष नंदुरबार, मनोज कामडी जिल्हाध्यक्ष पालघर,चेतन बांगारे जिल्हाध्यक्ष ठाणे,चिंधू आढळ पुणे जिल्हा संघटक, दादाजी बागूल बागलाण तालुका अध्यक्ष, मधूकर पाडवी तालुका अध्यक्ष पेठ , दादाजी पवार तालुका अध्यक्ष मालेगाव, केशव पवार जिल्हाध्यक्ष औरंगाबाद इत्यादी पदाधिकारी सह अनेक युवा कार्यकर्ते यांचा समावेश करण्यात आला आहे. ही युवा टिम गाव तेथे शाखा तालुका तेथे शाखा व जिल्हा शाखा तयार करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
बिरसा क्रांती दलाच्या वाढत्या शाखांचा उपक्रम व सामाजिक कार्य बघून काही आदिवासी संघटनांनी युवा टिमशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. सुशिलकुमार पावरा यांनी 5 आदिवासी संघटना संस्थापक अध्यक्ष यांच्याशी बातचीत सुद्धा केली आहे. या 5 आदिवासी संघटनांची नावे सुशिलकुमार पावरा यांनी गुपीत ठेवली आहेत. योग्य वेळी या संघटनांची नावे जाहीर करणार असल्याची माहिती सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे. युवा टिमवर विश्वास ठेवून ह्या 5 आदिवासी संघटना स्वखुशीने बिरसा क्रांती दलात काम करण्यास तयार होत आहेत. लवकरच ह्या 5 नावाजलेल्या आदिवासी संघटना बिरसा क्रांती दलात विलीन होतील, बिरसा क्रांती दल या एकाच बॅनरखाली काम करतील. असा गोप्यस्फोट बिरसा क्रांती दलाचे युवा राज्याध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी सांगितले आहे. लाकडाऊन उठल्यानंतर या 5 ही आदिवासी संघटनांचा बिरसा क्रांती दलात जंगी कार्यक्रमाद्वारे स्वागत व सत्कार करण्यात येईल, अशी माहिती सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
Tags
news