शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एस पी डी एम कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात दिनांक ३० मे २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा उत्साहाने संपन्न झाला. या मेळाव्याचे प्रास्ताविक आयक्यूएसी चे समन्वयक डॉ. डी. डी. भक्कड यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. दिनेश पाटील, डॉ. व्ही. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिपक देशमुख (वाणिज्य) रोहित वाडीले (मराठी), बादल पावरा (मराठी) मोहिनी राजपूत (पदार्थ विज्ञान), दिनेश गांगुर्डे (भुगोल), गौरव गिरासे (रसायनशास्त्र) इत्यादी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. एस. एन.पटेल यांनी माजी विद्यार्थी संघटनेची माहिती दिली. माजी विद्यार्थी संघटना ही महाविद्यालयाला दिशा देणारी संघटना आहे, महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे योगदान असते, सामाजिक ऋण फेडण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे, विद्यार्थ्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न यापुढेही महाविद्यालय करीत राहील, ही संघटना रचनात्मक विचाराने काम करणारी संघटना आहे असे प्राचार्य डॉ. एस. एन. पटेल म्हणाले.
कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचलन समन्वयक प्रो.डॉ. फुला बागूल यांनी केले. आभार प्रदर्शन सह समन्वयक डॉ. एस. एल. कादरी यांनी केले. या प्रसंगी तांत्रिक सहकार्य प्राध्यापक सोळंकी व संगणक विभागाकडूून प्राप्त झाले. सर्व कार्यक्रम झूम ॲप तसेच युट्युब या समाज माध्यमांवर प्रसारित झाला व त्याद्वारे जवळ जवळ ३५० विद्यार्थी, अभ्यासक, समाजसेवक, माजी विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधू-भगिनी यांनी या सर्व ऑनलाईन कार्यक्रमांचा लाभ घेतला.
सदर ऑनलाईन कार्यक्रम व अशे अनेक कार्यक्रम यशस्वी पध्दतीने राबविल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष भाऊसो डॉ.तुषारजी रंधे, संस्थेचे सचिव नानासो निशांतजी रंधे, कोषाध्यक्षा मा. ताईसो आशाताई रंधे, संस्थेचे विश्वस्त व कुलसचिव मा श्री रोहित रंधे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
सदर ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा च्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. एस. एन. पटेल, उपप्राचार्य प्रा. दिनेश पाटील, माजी नॅक समन्वयक डॉ. व्ही. एम. पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ. डी. डी. भक्कड,
आयक्यूएसी सह समन्वयक डॉ. एम. व्ही. पाटील, सदर कार्यक्रमाचे समन्वयक, प्रो.डॉ. फुला बागूल, सह समन्वयक डॉ. एस. एल. कादरी, प्रा.संदीप सोलंकी, प्र.कार्यालयीन अधिक्षक श्री. संजय निकम यांनी परिश्रम घेतले.
Tags
news