सोहम अकादमीने दिली जीवनसत्त्वयुक्त पदार्थांची मेजवानी, झटपट पौष्टिक नाश्ता पाककला स्पर्धेला सज्ज झाल्या गृहिणी



 

मुंबई - उत्तम आरोग्य हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली"* आहे. अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. चवदार, आरोग्यमय पदार्थ बनवून वाढणे यालाच आपण 'पूर्णब्रम्ह' असे म्हणतो. चव व पोषकमुल्य यांचा साधलेला मेळ हे आजच्या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य होते. "पाककला" म्हणजे नुसते स्वयंपाक करणे नसून त्यात शरीराला आवश्यक असणारी पोषणमूल्ये असणे हे आजच्या घडीला एक आव्हान आहे. मग या पाककलेची ऑनलाईन स्पर्धा ठेवली तर ? छान कल्पना आहे नाही!


यातूनच जुन्या व नवीन पाककृतींना उजाळा देणारी अशी आगळी वेगळी पाककला स्पर्धा आयोजित केली ती डॉ. मीनलजी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी, मुंबई यांनी. *"झटपट पौष्टिक नाष्टा"* या अनोख्या ऑनलाईन स्पर्धेला स्पर्धकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पौष्टिक लाडू, जीवनसत्त्व युक्त कटलेट, रवा व्हेज पिझ्झा रोल,मूग डोसा या आणि अशा अनेक नानाविध पदार्थांनी कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून खादाड खाऊ गृप च्या विजेत्या व झटपट पाककृतींच्या मार्गदर्शिका मा. कौमुदी जोग चाकवते मॅडम लाभल्या .त्यांनी स्पर्धकांचे कृती, सजावट, साहित्य व विशेष पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा वेळ, जीवनसत्त्वाची उपलब्धता या सर्व गोष्टीच्या आधारावर परीक्षण करून सोबतच पदार्थ उत्तम होण्यासाठी उपयुक्त सूचनाही दिल्या. त्या पदार्थासाठी पर्यायी वापरता येणाऱ्या भाज्या किंवा इतर घटक याचीही उपयुक्त चर्चा डॉ.मीनल मॅडम व त्यांनी  केली . अशा टिप्स स्पर्धकांना  उपयुक्त ठरल्या.
स्पर्धेचे ३ विजेते घोषित करण्यात आले.
प्रथम -सविता मेहेत्रे(पौष्टिक व्हेज कटलेट्स)
द्वितीय  -रंजना शेंडे(खान्देशी शेवळाडू)
तृतीय  -स्मिता व्यवहारे(रवा पिझ्झा रोल)

सर्वच पाककृतींनी खवय्यांचे लक्ष वेधून घेतले. डॉ. मीनल भोळे मॅडमच्या संकल्पनेतून साकार झालेला हा आगळावेगळा कार्यक्रम खूपच रंगतदार झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीक्षा तावडे, वैशाली मंडलिक, प्रिया उपासनी, रेवती येवला, तंत्रस्नेही गया मेहेत्रे मॅडम व आमचे सर्व स्पर्धक व उपस्थित सर्व खवय्ये अशा सर्वांचे विशेष योगदान लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी सुगरणींना सोहम अकादमी तर्फे प्रमाणपत्र व डिजिटल कॅलेंडर भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाला स्पर्धकांचा, रसिकांचा प्रतिसाद इतका होता की कार्यक्रम संपूच नये असे वाटत होते. तरी वेळेचे बंधन असल्यामुळे सोहमच्या *कला करिअर* अंतर्गत होणाऱ्या वेबिनार प्रमाणेच *कला गुणदर्शन* अंतर्गत सुरु झालेल्या उपक्रमातील आजच्या पहिल्या स्पर्धेला उत्तुंग प्रतिसादा सह स्पर्धेची  नियोजनबद्ध आखणी, सादरीकरण, पदार्थाची मांडणी अगदी कौतुकास्पद होती. ह्या सुंदर उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने