अरुणावती नदीच्या बंधाऱ्यात मासेमारी करतांना मयत झालेल्या समाज बांधवाला भोई समाज मदत केंद्र ग्रुप महाराष्ट्र तर्फे कुटुंबाला आर्थिक मदत..!




शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर शहराजवळील अरुणावती नदीच्या बंधाऱ्यात मासेमारी करतांना गाळात रुतल्याने बुडून मयत झालेल्या अंबिका नगर मधील ४० वर्षीय समाज बांधवाच्या कुटुंबाला भोई समाज मदत केंद्र ग्रुप महाराष्ट्रतर्फे आज रविवारी सकाळी रोख स्वरूपात १७ हजार ७५० रुपयांची आर्थिक मदत मयताच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला.     


    
शहरातील अंबिका नगर मधील पांडुरंग बाबूलाल भोई वय ४० हा २५ मार्च २०२१ अरुणावती नदीच्या बंधाऱ्यात मासेमारी करतांना गाळात रुतल्याने पाण्यात बुडून मयत झाला होता.गरीब कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या पश्चात पत्नी संगिता पांडुरंग भोई व तिन मुली यांचा उदरनिर्वाहचा गंभिर  प्रश्न निर्माण झाला होता,  

म्हणुनच भोई समाज मदत केंद्र ग्रुप महाराष्ट्र तर्फे कुटुंबाला आर्थिक मदतसाठी आवाहन करण्यात आले होते.संपुर्ण महाराष्ट्रातुन समाज बांधवानी गुगल पे व फोन पे द्वारे आर्थिक मदत करण्यात आली. समाज बांधवाकडून आज ९ मे २०२१ रोजी मदत केंद्र तर्फे स्व:पांडुरंग बाबुलाल भोई यांच्या घरी जाऊन त्यांचे पत्नी संगिता पांडुरंग भोई व तिन्ही मुली ललिता पांडुरंग भोई वय १४ वर्ष किर्ति पांडुरंग भोई वय १२ वर्ष
उर्मिला पांडुरंग भोई वय८वर्ष यांना जमा झालेली रक्कम देण्यात आली.

यावेळी भोई समाज मदत केद्रं महाराष्ट्रचे समन्वयक टिमचे पुनमचंद मोरे, सुभाष भोई,तरुण गर्जनाचे संस्थापक संतोष भोई, जळगांवचे महारू शिवदे, संजय भोई आदी उपस्थित होते


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने