प्रतिनिधि, शिरपूर
तालुक्यातील जोयदा येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय शिरपूर यांच्या वतीने गावातील शेतकऱ्यांना बी उगवण क्षमता तपासणी , बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक कृषी साहायक संजय पावरा यांनी करुन दाखवले. यावेळी उपस्थित शेतकरीही कुतूहलाने सारी क्रीया पाहत होते. सोयाबीनच्या शंभर बीया तागाच्या ओले केलेल्या पोत्यावर 10×10 च्या 10 रांगा करून, ऊगवण क्षमता सहज सोप्या पद्धतीने समजावून दिली. दरम्यान शेतकऱ्यांनी स्वत: कडील बियाणे उगवण क्षमता तपासून व बिज प्रक्रिया करुन पेरणी करावी असे आवाहन करण्यात आले. तसेच खताची 10% बचत,महाडिबीटी वरिल
विविध योजनांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना कागद अपलोड करण्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शनासाठी तालुका कृषि अधिकारी,कार्यालय शिरपूर यांचे वतीने कृषि सहाय्यक संजय पावरा,कृषि पर्यवेक्षक श्री कदम उपस्थित होते. मार्गदर्शनाबद्दल तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे आभार गावातील शेतकरी गियान पावरा यांनी मानले. यावेळी ताराचंद पावरा, विनोद पावरा, बबन पावरा, संजय पावरा, सुताऱ्या पावरा, शांतीलाल पावरा, मनिलाल पावरा, भोंगा पावरा आदी शेतकऱ्यांसमेत तालुका युवक कांग्रेस ग्रामीण चे अध्यक्ष गेंद्या पावरा उपस्थित होते.
Tags
news
