विरेगाव प्रतिनिधी
गोंदी पोलीसांची कार्यवाही . दि 19 मे रोजी काकासाहेब आत्माराम कटारे रा.अंबड ता.अंबड यांनी पोलीस चौकी लाहागड येथे समक्ष हजर येवूण फिर्याद दिली की मी खडी सप्लाय करूण मी माझी उपजीवीका चालवतो मला दिनांक 19 मे रोजी 03.00 वा सूमारास कॉल आला की .मला गणेशनगर महाकाळा येथे दहा ब्रास खडी टाकायची आहे तूम्ही तूमची एक गाडी पाटवूण द्या असे सांगीतल्याने मी माझी टाटा कंपनीचे हायवा गाडी क्रं MH 42 T 7988 या मध्ये 05 ब्रास खडी भरूण चालक नामे विष्णू नाथा खडके याच्या हस्ते गणेशनगर महाकाळा येथे माझी नमूद हायवा गाडी पाठवूण दिली त्या नंतर 04.30 वा सूमारास चालक नामे विष्णू नाथा खडके याने मला कॉल करूण सांगीतले की भाऊ महाकाळा येथे उड्डान पूलाजवळ एक इसम यांने तूम्हाला खडी टाकण्यासाठी मी जागा दाखवितो तूमची गाडी तेथे जाते का नाही ते पाहूण घ्या असे म्हणाले मी आपली हायवा गाडी महाकाळा उड्डान पूलाजवळ उभी करूण त्याच्या चारचाकी वाहनामध्ये बसलो सदर इसमाने मला चूर्मापूरी रोड ने घेवूण गेला व एका ठिकाणी गाडी थांबवूण त्या ठिकाणी जागा आहे तूम्ही पाहूण या तो पर्यंत मी गाडी वळूण आणतो असे म्हणाल्याने ती गाडीच्या खाली उतरूण जागा पाहण्या साठी गेलो असता सदर गाडी चालक हा मला तेथे सोडूण त्याची चारचाकी वाहन वेण तेथून निघूण आला तेव्हा मी माझी हायवा ज्या ठिकाणी लावली होती त्या ठिकाणी मी पायी चालत आलो तेव्हा मला आपली हायवा दिसली नाही असे कळविल्याने मी तेथे आलो व गाडीचा शोध घेतला असता नमूद हायवा मिळूण आली नाही येणे प्रमाणे फिर्यादी वरूण पोलीस ठाणे गोंदी कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा आम्ही तात्काळ तपास पथक तयार करूण त्यांना योग्य ते मार्गदर्शन करूण सदर चोरी गेलेले वाहन शोधणे बाबत आदेश दिला.त्यावरूण सदर वाहनच्या शोधार्त तपास पथक रवाना झाले व संशयीत ईसम नामे हरी शिवदास वंजारी यास चौकशी कामी ताब्यात घेवूण विचारपूस केली असता त्याने सदर हायवा वाहन चोरल्याची कबुली दिल्याने सदर चे वाहन हे त्याच्या ताब्यातून जप्त करूण पोलीस चौकी शहागड येथे लावण्यात आले आहे . सदर ची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री विनायक देशमूख साहेब , मा.अप्पर पोलीस अधिक्षक साहेब श्री विक्रांत देशमुख साहेब , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सूनिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ची कार्यवाही , पोलीस निरीक्षक शितलकूमार बल्लाळ , पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे , पोलीस अंमलदार दिलीप दिवटे , सूशिल कारंडे , अशोक भांगळ , राम कोलगडे , महेश तोटे , संतोष डोईफोडे , गणेश अवचार यांनी केली .
Tags
news
