बनावट सही करून पैशांचा अपहार व मारहाणीचा प्रयत्न करणा-यांविरोधात गुन्हा दाखल बिरसा क्रांती दलाने केली चौकशी व अटकेची मागणी





तळोदा: बनावट  सही करून पैशांचा अपहार करणा-या व त्या अनुषंगाने  घरात येऊन  अश्लील शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न करत जीवे ठार मारण्याची धमकी दमदाटी करणा-यांवर  फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सुभाष पावरा तालुका अध्यक्ष तळोदा बिरसा क्रांती दल यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती तळोदा व पोलीस निरीक्षक तळोदा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तळोदा पोलीस ठाण्यात भा.द.वि.क. 323,504,506,34 अन्वये फौजदारी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     निवेदनात म्हटले आहे की , सौ.मंगला सुभाष पवार मौजे मालदा तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार यांचा दिनांक 27/05/2021 रोजीचा बिरसा क्रांती दल संघटनेस  अर्ज प्राप्त झाला आहे. तक्रार अर्जान्वये सौ. मंगला सुभाष पवार मौजे मालदा तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार ह्या  बचत गटातील ग्रामसंघामध्ये खजिनदार म्हणून काम पाहतात. खजिनदार यांची नकली सही करून C.R.P. 1) विना शिववाल खर्डे 2) उषा शिवलाल खर्डे  3) हिना शिवलाल खर्डे 4) डुमनी श्रावण खर्डे 5) सरस्वती संतोष खर्डे सर्व राहणार मालदा तालुका तळोदा यांनी  दिनांक:05/05/2020 रोजी 60,000/ रूपये , दिनांक: 28/05/2020 रोजी 200000/ रूपये , दिनांक:04/06/2020 रोजी 80,000/ रूपये चेकद्वारे पैसे काढून घेतले आहेत. 
    बनावट  सही करून पैसे काढून घेतल्याचे ग्रामसंघामध्ये खजिनदार यांनी उघडकीस आणल्यामुळे त्याचा राग मनात धरून तुम्ही दोघं माणसे (सौ.मंगला सुभाष पवार व श्री. सुभाष कालूसिंग पवार ) आम्हाला ग्रामसंघात नको आहेत. पैसे ,पासबुक ,चेक , शिक्के वगैरे सर्व काही रेकॉर्ड अध्यक्षाकडे पाहिजे असे सांगून पाठवले. दिनांक :11/09/2020 रोजी वरील सर्व इसम सौ.मंगला सुभाष पवार खजिनदार यांच्या घरी येऊन  शिवीगाळ करून धमकी दमदाटी करून गेले.
    खजिनदार यांनी चेकवर सही दिली नाही म्हणून C.R.P.ने त्यांचे भाऊ मनेश प्रेमचंद खर्डे, आकाश शिवलाल खर्डे यांच्या काका मोहन फाड्या खर्डे सह हे सर्व इसम सौ.मंगला सुभाष पवार यांच्या घरी दिनांक 27/05/2021 रोजी रात्री 8.30 ते 9.00 वाजेच्या दरम्यान काठ्या घेऊन मारहाण करायला आले.अश्लील शिवीगाळ करून मारहाणीचा प्रयत्न केला. तूम्ही  जिथे दिसेल तिथे  ठार मारू अशी   जीवे मारण्याची धमकी   देऊन गेले आहेत. त्यामुळे आमच्या कुटुंबातील सदस्यांना वरील व्यक्तींपासून जीवीतास धोका आहे. म्हणून ग्रामसंघाच्या बनावट सहीने पैसे काढल्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी व त्या अनुषंगाने आमच्या घरात  आम्हाला अश्लील  शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न करत जीवे ठार मारण्याची  धमकी दमदाटी करणा-या दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी. असा तक्रार अर्ज आहे. तरी बनावट सही करून पैशांचा अपहार करणा-या व त्या अनुषंगाने तक्रार दार यांच्या घरात येऊन अश्लील शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न करत जीवे ठार मारण्याची धमकी दमदाटी करणा-यांविरोधात कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी. अशी मागणी बिरसा क्रांती दल तळोदा तालुका शाखा तर्फे करण्यात आले आहे. तशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार, गटविकास अधिकारी पंचायत समिती तळोदा व पोलीस निरीक्षक तळोदा यांना देण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने