शिरपूर - कोराना आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता,शिरपुर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता केंद्रिय पथक समिती सदस्य डाॅ.रामप्रताप सैनी व डाॅ.एस.के.साधुखान यांच्या बरोबर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.मनिष पाटिल यांनी शिरपुर शहरांसह तालुक्याच्या दौरा करुन ,कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची वस्तुस्थिती जाणुन घेतली.
सदर केंद्रिय पथकाचे तालुका सीमेवर सावळदा येथे डाॅ.प्रसन्नकुमार कुलकर्णि व डाॅ.राष्ट्रपाल अहिरे यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.
तिथुन शिरपुर तहसिलदार श्री आबा महाजन यांच्या समवेत प्रा.आ.केंद्र वाडी येथे कोव्हिड लसीकरण सत्राला समितीने भेट दिली.शितसाखळी योग्य पद्धतीने अवलंबिली जाते कि नाही,लसीकरण योग्य पद्धतीने होते किंवा नाही याची समितीने खातरजमा केली.
वाघाडी येथे कन्टेनमेन्ट झोनची पहाणि करुन माहिती जाणुन घेतली,कन्टेनमेंन्ट झोनला बॅरीकेट लावणे,दररोज कुटुंब सर्व्हेक्षण करणे व तेथील लोकांच्या सुविधांबद्दल पाहणि केली.
त्यानंतर कोव्हिड केअर सेंटर शिंगावे येथे भेट दिली डाॅ.मनोज पाटील व डाॅ.अनिल पाटिल व स्टाफ कडुन माहिती घेवुन रुग्णांची व्यवस्था व जेवणाची पहाणि करुन अत्यावश्यक औषधसाठा व इतर साहित्य साठा उपलब्ध आहे की नाही याची विचारपूस केली.
शिरपुर शहरांतील विद्याविहार काॅलनितील प्रतिबंधित क्षेत्रास भेट दिली तेथे शिरपुर मुख्याधिकारी यांच्याकडून माहिती जाणुन घेतली,व शहरांतील इतर कन्टेनमेंन्ट झोनची स्थिती जाणुन घेतली.
शेवटी उपजिल्हा रुग्णालय शिरपुर येथिल डेडिकेटेट कोव्हिड हेल्थ सेंटर ची पहाणि केली.डाॅ.ध्रुवराज वाघ यांच्याकडून वस्तुस्थिती जाणुन घेतली,दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल व येणार्या अडचणिबद्दल मत जाणुन घेतले.
मा.आमदार सो काशीराम पावरा यांनीही उपजिल्हा रुग्णालयात शिरपुर येथे येवुन केंद्रिय समितीची भेट घेतली व शिरपुरची कोव्हिड परिस्थिती व इंजेक्शन रेमडिसेविर चा तुटवडा या गोष्टीं समिती सदस्यांपुढे मांडल्यात.
सदर समितीने आज केलेल्या पाहणीचे निष्कर्ष समिती मार्फत वरीष्ठस्तरावर पाठविले जावुन आरोग्ययंत्रणा बळकटीकरण वा उपाययोजनांचे पुनर्विलोकन केले जाईल.
शिरपुर तालुक्यातील आरोग्ययंत्रणे बाबत समितीने समाधान व्यक्त केले व केलेल्या कामाचे रिपोर्टिग बाबत योग्य त्या सुचना दिल्यात.
Tags
news
