पुण्यातील विकेंड लॉकडाऊन संपला ; 30 एप्रिल पर्यंत कठोर निर्बंध मात्र कायम




 प्रतिनिधी दत्ता पारेकर 
 
पुणे:कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार नुकताच शनिवारी आणि रविवारी पहिला विकेंड लॉकडाऊन सुध्दा पार पडला. या दोन दिवसांत पुणे शहरात आणि ग्रामीण भागात  रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यानंतर आज सोमवारी हा विकेंड लॉकडाऊन संपला असला तरी देखिल पुण्यात कठोर निर्बंध कायम असणार आहेत. 

 
विकेंड लॉकडाऊन आज सकाळी 7 वाजता संपला आहे.असे असले तरी संध्याकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी आणि सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश मात्र 30 एप्रिल पर्यंत लागू असणार आहेत. याची अंमलबजावणी सोमवार ते शुक्रवार केली जाणार आहे.

 
दरम्यान काय सुरु असेल ?

जीवनावश्यक वस्तुंची दुकाने
हॉटेलमार्फत फक्त पार्सल सेवा सुरु
सर्व भाजी मंडई आणि दूध
मेडिकल, आरोग्यविषयक यंत्रणा
उत्पादन क्षेत्रातील सर्व उद्योग
खाद्यपदार्थ विक्री स्टॉल, टपऱ्यांकडून पार्सल सेवा
राज्य परिवहन मंडळाची (एसटी) बससेवा, विमान प्रवास
ऑनलाईन शिक्षण
प्रसारमाध्यमं, वृत्तपत्र छपाई आणि वितरण
सर्व बँका, विद्युत कंपन्या, आयटी कंपन्या, वकील, सनदी
लेखापालांची कार्यालये
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे जाहीर अत्यावश्यक सेवा 
तर काय बंद असेल ?
 
जीवनावश्यक आणि अत्यावश्य सेवा वगळता सर्व दुकाने
शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस
पीएमपीएमएल बससेवा
हॉटेल, बिअर बार, रेस्टॉरंट्स
मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, बागा, व्यायामशाळा, स्विमिंग
पूल, वॉटर पार्क, क्रीडा संकुल, स्पा सेंटर, सलून, ब्यूटी
पार्लर, केश कर्तनालय, फूड मॉल, आठवडी बाजार
सर्व धार्मिकस्थळं
सरकारी, सामाजिक, राजकीय कार्यक्रम, सभा

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने