रेमडेसिवीर इंजेक्शन ची निर्यात बंदी - कोरोना संसर्ग वाढल्याने केंद्र सरकारचा निर्णय




नवी दिल्ली - कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात थांबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशातील कोरोनाची स्थिती जोवर सुधारत नाही तोवर रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात बंद राहणार आहे, असं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

देशातील प्रत्येक स्थानिक औषध निर्मिती संस्थांना त्यांच्या संकेतस्थळावर रेमडेसिवीरचा उपलब्ध साठ्याची माहिती देण्याचेही आदेश केंद्रानं दिले आहे
याशिवाय देशातील सर्व औषध प्रशासन आणि अधिकाऱ्यांना रेमडेसिवीर औषधांच्या साठ्याची इत्यंभूत माहिती आणि नोंद घेण्याच्या सूचना देखील केंद्रानं जारी केल्या आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी देखील योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता येत्या काळात रेमडेसिवीरची देशांतर्गत मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. रेमडेसिवीरच्या उप्तादनावरही बारकाईनं लक्ष असल्याचंही केंद्रानं सांगितलं आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने