सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे उदया धुळे जिल्हा दौऱ्यावर



धुळे, दि.  (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे सोमवार 5 एप्रिल 2021 रोजी धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 
मंत्री श्री. टोपे यांचा दौरा असा : सोमवार 5 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, धुळे येथे आगमन व राखीव, दुपारी 3.30 वाजता धुळे जिल्ह्यातील कोविड – 19 चा प्रादुर्भाव व अनुषंगिक उपाययोजना यासंदर्भात बैठक, दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथून कुसुंबा, ता. जि. धुळेकडे प्रयाण, सायंकाळी 5 वाजता कुसुंबा येथे किरण शिंदे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, सायंकाळी 6.30 वाजता कुसुंबा, ता. जि. धुळे येथून मुंबईकडे प्रयाण होईल अशी माहिती प्रसिद्धीस देण्यात आली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने