महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभ प्रसंगी १ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत इंजिनिअरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्य. - ईकेएस, महाराष्ट्र राज्य यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्विझ आयोजित केले आहे. क्विझ गूगल फॉर्मद्वारे आयोजित केली जात आहे. आजकालच्या पिढीत महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान मूर्तींचे विचार पुन्हा नव्याने निर्माण करण्याची गरज आहे, असा विश्वास इंजिनिअरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्याचे प्रादेशिक प्रमुखांनी व्यक्त केला. आणि त्या कारणास्तव, त्यांच्या जीवनाच्या पैलूंवर ही क्विझ आयोजित केली जाईल. या सर्व गोष्टींमध्ये विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच पालकांचाही समावेश खूप मोलाचा ठरेल आपण या ऐतिहासिक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे कारण अशा ऐतिहासिक गोष्टीने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि आयुष्याला एक चालना मिळते. म्हणूनच आम्हाला खात्री आहे विद्यार्थ्यांसोबत आपणही यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
********
*✨इंजिनिअरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्य*✨
थोर समाजसुधारक *महात्मा फुले* व भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न महामानव *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या जयंती निमित्त ,इंजिनिअरिंग कृती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित *"ऑनलाईन प्रश्नमंजुषा"* स्पर्धेत सहभाग घेऊन मिळवा तुमच्या मेलवर सर्टिफिकेट. १एप्रिल २०२१ पासून १४ एप्रिल २०२१ रात्री ८.०० पर्यंत आपला सहभाग नोंदवा.
*लिंक*-👇👇
http://bit.ly/EKSQuizContest
Tags
news
