मालपुर गावात कोरोना रुग्नाची वाढती संख्या , कडक नियम करण्याची गरज





                                
प्रभाकर धनगर  ।शिंदखेडा तालुका प्रतिनिधी.                         
मालपुर गावात कोरोनाने कहर केला आहे. करोना रुग्नांची संख्या दिवसें दिवस वाढतच आहे.त्यामुळे शासनाने दि.८/४/२०२१ते.१८/४/२०२१पर्यंत कडकडित बंदपाळण्याचे आदेश आहेत. मात्र तरी देखील विना कामाची गर्दी काही लोक करतांना बस स्टॅंड विभागात दिसुन येतात. विना मास्क फिरतात कोणी कोणाचे ऐकुन घेयायला तयार नाहीत.त्यांचाच दूषपरिणाम मालपुरच्या वयोवूद्धांना भोगावा लागत आहे. रोज तीन चार मृतांचा आकडा पार करत आहेत सर्वञ भितीचे वातावरण तयार झाले आहे. अंतिम याञेला देखील पाच ते सहा लोक पाहण्यास मिळत आहेत.  खाजगी दवाखाना माञ प्रचंड गर्दी दिसुन येत आहे. मेडिसिनच्या दुकानात तर लांबचलांब रांग दिसतांना आढळुन येत आहे. मागच्या आठवड्यात  कोरोना बाधीतांची संख्या शंभरी पार केल्याचे दिसुन आले.                                          शासन स्तरावर कोरोनाासंसर्ग रोखन्यासाठी  गाव पातळीवर कोविड संनियंञण समितीस्थापन करण्यात आलेली आहे. ती  माञफक्त आणि फक्त कागदोपञीच आहे. माञ प्रतेक्षकुती दिसुन येत नाही. आज माञ ग्रामपंचायत प्रशासनकडुन संपुर्ण मालपुर गावात निर्जंतुकरण फवारणु करण्यात आली. त्यावेळी कर्मचारि.श्री.विष्णु भावसार, वार्ड क्रमांक २ व ३चे माजी ऊपसरपंच श्री.जगदिश सखाराम पाटील.,शिपाई रामसिंग भिल, वाॅटरमन श्री.शांताराम तावडे. आदिंनी परिश्रम घेतले व सर्व वार्डला फवारणी केली.  
माञ दोंडाईचा पोलीसानी  दिवसातुन एक दोन वेळा गस्त घालून नियंत्रण ठेवण्यासाठी  व नियम न पाळनार्यांना  शिक्षा करून कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. तोंडावर मास्क वापरत नाही त्यांना अध्धल घडविली पाहिजे अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच घरोघरी जावुन दाढी कटिंग करणारे न्हावी  वर बंदी केली पाहिजे. ग्रामपंचायत प्रशासन वेळोवेळी कंटेमेंन्ट क्षेञात फवारणी करण्यात येत आहे.             माञ गावपातळीवर  कोविड संनियंञण समिती कुच कामी ठरत आहे. असेच म्हणावे लागेल  देशी विदेशी दारु सर्रासचालु आहेत  बस स्टॅन विभागात विना काम फिरण्याची गर्दी कमी होत नाही. समितीकडुन कठोर अशी कारवाई होतांना दिसत नाही. तरी स्थनिक प्रशासन व पोलिसांनी नियम कडक करावे अशी अपेक्षा गावकर्‍यांची आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने