कोरोना महामारी च्या संकटकाळात लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग कोलमडून पडले. त्याचप्रमाणे शेती व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करणारा शेतकरी राजाने देखील काही स्वप्न बघितली होती की आता कोरोना गेला आता आपण आपल्या शेतीत चांगल्या पद्धतीचे उत्पन्न घेऊ आणि त्यातून दोन पैसे मिळवून. पण फेब्रुवारी मार्च च्या दरम्यान कोरोणाची दुसरी लाट सुरू झाली आणि सरकारने त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी लॉकडाऊन ची घोषणाही झाली. पण या सर्व गोष्टीचा फटका शेतकऱ्यांच्या शेतमालाला अप्रत्यक्षरीत्या बसताना दिसत आहे. धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील युवा प्रगतिशील शेतकरी जितेंद्र रमेश बोरसे यांनी दोन लाख रुपये खर्च करून शेडनेटमध्ये काकडी पिकाचे उत्पन्न घेतले. त्यासाठी लागणाऱ्या रोपांचा खर्च जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये त्यांनी केला. पण आता त्यांच्या काकडीचे उत्पन्न निघायला लागले आणि सरकारने लॉक डाऊन घोषित केले. त्यामुळे हा युवा शेतकरी पूर्णतः संकटात सापडला आहे. याच्या काकडीला रुपये - दोन रुपये किलोने मागणी आहे. त्यातून त्यांनी टाकलेला खर्चही निघत नाही. तसेच ज्या वाहनाने हा शेतमाल मार्केटला पाठवला जातो त्या वाहनाचे भाडे सुद्धा यातून वसूल होणे कठीण आहे. महाराष्ट्रात मागणी नाही म्हणून आपली काकडी गुजरात मध्ये सुरत मार्केटला पाठवण्याचा त्यांनी निर्णय घेतला पण सर्वत्र कोरोणामुळे परिस्थिती सारखीच असल्यामुळे शेवटी त्यांनी आपली काकडी तोडून जनावरां पुढे टाकली आहे आणि निराशा व्यक्त केली आहे. हीच परिस्थिती गावातील पपई उत्पादक शेतकरी धनसिंग बहादूरसिंग पवार यांची झाली आहे कोरोना लॉक डाऊन मुळे पपई पिकावर ट्रॅक्टर फिरवावा लागत आहे. मागील वर्षी देखील या जितेंद्र बोरसे या युवा शेतकऱ्याने शिमला मिरचीचे उत्पादन घेतले आणि त्यांना कोरोना संकट काळामुळे याच प्रकारच्या निराशेला सामोरे जावे लागले. नाविन्याची कास धरणारे हे युवा शेतकरी जर असेच निराशेच्या गर्क छायेत जाऊ लागले तर येणारा भविष्यकाळ हा कठीण आहे. म्हणून शासनाने शेतकऱ्यांच्या या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि आणि शेतमालाच्या भावा संदर्भात नवीन नियमावली जाहीर करावी अशी आशा शेतकरी जितेंद्र बोरसे व धनसिंग पवार यांनी व्यक्त केली आहे.
Tags
news
