प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील यांचे कोरोनामुळे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी हजेरी लावली होती.
राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारानिमित्त काही दिवसांपूर्वी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विविध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेला माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील हे देखील उपस्थित होते.9 एप्रिलला सभेपूर्वी बाबासाहेब भीमराव पाटील यांनी कोरोनाची लक्षण दिसत असल्याने पाटील यांनी कोरोनाची चाचणीही केली होती. पाटील यांना या सभेच्या वेळी त्रास जाणवत होता. ही सभा संपल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री पाटील यांचा मृत्यू झाला
Tags
news
