प्रभाकर धनगर। शिंदखेडा तालुका प्रतिनिधी.
मालपुर गावात कोरोनाने चांगलाच थैमान घातला असुन रोज एक मृत्यु होत असुन तरी देखील मालपुरकर जनता गांर्भियाने घेत नाहीत. भाजी पाला विक्रेता सर्रास भाजी विक्रि करतांनादिसत आहेत, नियम मोडणार्या फाजिल तरुणांना चांगला चाफ दिला पाहिजे. तसेच मटन मासा वाले मागच्या दरवाजाने मांस विक्रि होते. हे सर्व मालपुर ग्रामपंचायतचे व कोविड संनियंञण समिती उघड्या डोळ्यांनी बघते. ती समिती फक्त नी फक्त नावालाच आहे. मागे गेल्या पाच दिवसापुर्वी दोंडाईचा तहसिलदार सुदाम महाजन यांनी दवंडी वगाडीत अलाउन्सर केले कि.प्रत्येक दुकानदार बंधुंनी सी.आर.टी.तपासणी करुनआपआपल्या दुकानासमोर बोर्ड लावावा या कडे माञ एकही दुकानदाराने तपासणी न केल्याचे ऊघडकिस आले आहे. व आधिकारी ही मालपुर गावात फिरकतांना दिसत नाहीत. दुसरीकडे मालपुर वैध्यकिय आधिकारी डाॅ.हितेंद्र पाटील यांनी जनतेला विनंती करुन लसीकरणाची महत्वपुर्ण माहिती सांगितली आहे .तरी देखील जनता लसीकरणास पाहिजे तेवढा प्रतिसाद देत नाहीत अशी खंत निभिडन्युजशी बोलतांना सांगितले. जर मालपुरकरांना कोरोनाला हरवायचे असेल तर घरीच थांबा. मास्क वापरा. शासनाचे नियम पाळले पाहिजे. मालपुरचे सुज्ञ नागरीक नानाभाऊ वसईकर म्हणतात .जे नागरिक शासनाला मानायला तयार नाहीत अशांनवर खरच कलम १४४लावली पाहिजे. दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे. नुसता दंड वसुल करुन काही ऊपयोग नाही.
Tags
news
