मालपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचार्‍यांपासुन ते पेशंट विना मास्क चा वापर




(श्री.प्रभाकर आडगाळे.)   
दोंडाईचा -   मालपुर ता. शिंदखेडा जि.धुळे.आज स्रियांचे नसबंधी शस्ञक्रिया शिबीर राबवत आहेत.तरीपेशंट सोबत आलेले विना मास्क चा वापर करतांना स्पस्ट दिसत असुन वैधकिय आधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष दिसुन येत आहे. विना मास्क प्रवेश निषेध चा बोर्ड तरी लावला पाहिजे. निदान तसे सुचित केले पाहिजे. ऐवढेच नव्हे चहा पाणी नास्ता चे दुकान मालक देखील बिनदास्त विना मास्क वापरुन चहा वाटप करित आहे.हे  वैधकिय आधिकारी यांना दिसत नाही का?  असा सवाल मालपुरकरांना सतावत आहे. एक तारखेला  मा.श्री जिल्हाधिकारी सो संजय यादव साहेब यांनी जनतेला विनंती केली होती. व शासन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते शिवाय जिल्ह्यात मास ते वापरणे करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाईचे देखील आदेश देण्यात आले आहेत मात्र याबाबत आरोग्य अधिकारी यांच्या यांच्यात दिसून येत आहे आरोग्यआधिकारीच असे वागतील तर सर्व सामान्यांचे काय? मालपुर गावात नुकतच एक पाझिटिव्ह पेशंट आढळले होते तरी सरपंच व ग्रामविकास आधिकारी यांनी खबरदारी चे ऊपाय म्हनुन लक्ष दिले नव्हते.      महाराष्ट दुसर्‍या लाटेच्या ऊंबरट्यावरअसतांना .मुंबईतगेल्या काही दिवसापासुन  करोनाबाधीतांची संख्या वेगाने वाढत आहेयांची भान ठेवुन नागरिकांनी नियम पाळले पाहिजे. अधिकाऱ्यांनी देखील याचे गांभीर्य ओळखून नियमांचे पालन करून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणे आजची प्रमुख गरज आहे सतर्करहा.मास्क लावा. घरीचथांबा.





Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने