ह.भ.प.श्री हरिभाऊ (दादा) झोडगे यांना ७३ व्या वाढदिवस सोहळ्यानिमित्त जीवनगौरव पुरस्कार प्रदान...!





मुंबई - चिंतामणी कट्टा व ऋतुराज स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष ह.भ.प.श्री हरिभाऊ (दादा) झोडगे यांच्या ७३ व्या वाढदिवस सोहळ्याचे औचित्य साधून व त्यांचे उल्लेखनीय असे सामाजिक कार्य पाहता त्यांना प्रथमच लालबाग परळ विभागांतील चिंचपोकळी नगरीत चिंतामणी कट्ट्यातर्फे चिंतामणी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हरिभाऊ यांनी आतपर्यंत अनेक गरजू विद्यार्थ्याना शलोपयोगी वस्तूंचे वाटप तसेच त्यांची शालेय फी भरली आहे, टाटा हॉस्पिटल मधिल अनेक गरजू रुग्णांना अल्पोपहार वाटप केले आहे, मुंबईतील अनेक अपंगांना कृत्रिम पाय व व्हीलचेअर उपलब्ध करून दिलेली आहे अशी अनेक समाजपयोगी आणि उल्लेखनीय कार्याची योग्य ती दखल घेऊन आम्ही त्यांना जीवनगौरव हा उचित सन्मान त्यांना प्रदान केलेला आहे असे चिंतामणी कट्ट्यातर्फे प्रसिद्धी पत्रकांतून म्हंटले आहे. याप्रसंगी ऋतुराज स्पोर्ट्स अकॅडमीचे चिटणीस ऋतुराज शिरोडकर, वेदांत शिरोडकर, 
ऋतुराज स्पोर्ट्स अकॅडमी आणि चिंतामणी कट्टाचे सर्व सदस्य कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने