धुळे तालुक्यातील मुकटी येथे महामार्गावर असलेल्या अंचाडे रोडाच्या कॉर्नरजवळील सनी इलेक्ट्रॉनिक दुकानाला काल रात्री १ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.दुकानात अग्नितांडव बघून ग्रामस्थ भयभीत झाले होते.तसेच दुकानाच्या बाजूला असलेल्या मेन्स पार्लर,सायबर कॅफे, व मेडिकल स्टोअर्स यांचा देखील धोका अटळ होता,गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी जिकरीचे प्रयत्न केल्याने सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली.
सनी इलेक्ट्रॉनिक हे मोठे व प्रसिद्ध दुकान असून या दुकानात इलेक्टरीकल साहित्य,मोटारी,पंखे,पाईप,वायर,शेतीविषयक अवजारे,अशा अनेक वस्तूंनी हे दुकान भरलेले होते.या अग्नितांडवात ३५ लाखांच्या वर दुकानाचे नुकसान झालेले दिसून येते.तसेच या दुकानाला तारेचे कम्पाउंड करण्यात आले होते.रात्री अचानक या दुकानात प्रचंड अग्नीचा ज्वाळा बघून नागरिकांसह गावातील पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.व त्यांनी तात्काळ अग्निशामकच्या गाड्या बोलावून ही आग आटोक्यात आणली.दुकानात अग्निने पेट घेणाऱ्या वस्तू असल्याने आग विझवणे जिकरीचे ठरले होते.या दुकानाच्या स्वेटर्स जवळ पीओसी पाईप व मोटारसायकल लावण्यात आली होती.आगीत सर्वप्रथम मोटारसायकल व पाईप पेट घेताना दिसून आले. यावरून झालेल्या घटनेत नागरिकांसह दुकानाचे मालक दिलीप चव्हाण यांनी अनेक शंका उपस्थित करत दुःख व्यक्त केले.
*दुकान मालकांच्या प्रतिक्रिया*
मी अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करत असताना दुकानात धोका निर्माण होणार नाही याची सतत काळजी घेत होतो.परंतु या घटनेतून हेतुपुरस्कर ही घटना घडवून आणली असल्याची शंका व निष्कर्ष निर्माण केला . आयुष्यात पैशांचा लोभ न करता मी माझ्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडून फक्त म्हातारपणाला आधार म्हणून हा व्यवसाय करत होतो. परंतु या घटनेतून खूप मोठा घात झाल्याचे दुःख दुकानाचे संचालक दिलीप चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
Tags
news
