धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झालेल्या चांगदेव परिवर्तन पॅनलच्या शितलताई राजेंद्र राजपूत यांची ग्रामपंचायती वर नवनिर्वाचित सरपंच म्हणून निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल गावातील सामाजिक संस्था स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सरपंच शितलताई राजपूत व माजी ग्रामपंचायत सदस्य राजू दादा पहिलवान यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी संस्थेच्या माध्यमातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संयुक्त व सामाजिक उपक्रम आपण गावात राबऊ असे आश्वासन सरपंच यांनी दिले. त्यावेळी स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जयदीप पवार, बचत गटाचे अध्यक्ष आनंदा मराठे, सचिव प्रवीण बोरसे, उपाध्यक्ष अनिल शिंदे, सहसचिव अविनाश वाघ, जयु सर, नाना भोसले, युवराज पहिलवान आदी उपस्थित होते..
Tags
news
