शिरपूर : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुकाध्यक्षापदी सौ. सुरेखा राजेंद्र गिरासे रा. पळासनेर ता. शिरपूर यांची दि.८ मार्च रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्ती पत्र भारतीय जनता पार्टी प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा हस्ते देण्यात आले आहे. शिरपूर भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांचाशी चर्चाविमर्श करुन भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षापदी सौ. सुरेखा गिरासे यांची नियुक्ती जाहिर केली आहे. भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा हस्ते तसे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर पं. स. माजी उपसभापती जगन पावरा, जि. प. सदस्या सौ. सखुबाई पारधी, भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेविका सौ. मोनिका शेटे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अॅड. गायत्री पाटील, भाजपा शहर सरचिटणीस रोहित शेटे, सुभाष नगर सरपंच विजय पवार आदि उपस्थित होते. नियुक्ती पत्रात म्हटले आहे कि आगामी काळाकरिता आपली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शिरपूर तालुकाध्यक्षापदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मागील अनेक वर्षे आपण सामजिक व राजकिय क्षेत्रात सक्रीयपणे कार्यरत असतांना समाजातल्या सर्वच वर्गात आपले कार्य उल्लेखनीय आहे. आपला महिलांच्या विविध प्रश्नावर असलेला सखोल अभ्यास व समर्पण लक्षात घेता तालुकाध्यक्षापदी आपणास सन्मानित करण्यात येत आहे. महिलांच्या विविध प्रश्नांसाठी येत्या काळातही आपले कार्य अविरत सुरु राहील म्हणून आपली ही नियुक्ती असुन शिरपूर तालुक्यातील भाजपा महिला मोर्चाचे संघटन अधिक मजबुत करण्यासाठी आपण अथक परिश्रम घेऊन ही जबाबदारी यशस्वरित्या पार पाडाल असा आत्मविश्वास असल्याचे म्हटले आहे. शिरपूर भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षापदी सुरेखा गिरासे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शिरपूर तालुकाध्यक्षापदी : सौ. सुरेखा गिरासे
byMahendra Rajput
-
0
