प्रा.आ.केंद्र रोहिणि येथे महिलादिन उत्साहात साजरा




   रोहिणि  - महिला दिनाचे औचित्य साधून प्रा.आ.केंद्र रोहिणि येथे आशास्वयंमसेवक व आरोग्यसेविका यांच्या सहभागाने महिलादिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.राष्ट्रपाल अहिरे वैद्यकिय अधिकारी यांनी  केले.तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात येवुन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
सुरवातीला आशा व आरोग्यसेविका यांची रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आलेली होती,त्यात श्रीमती कल्याणी देशमुख यांची बेटी बचाओ विषयांवर साकारलेली आकर्षक रांगोळी प्रथम पुरस्कार प्राप्त झाली.
  दुसर्या सत्रात योगशिक्षक सचिन जाधव यांनी सर्व उपस्थितांना  योगाचे जीवनातील महत्व विषद करुन प्रत्यक्ष  योगाभ्यास करुन घेतला.
तिसर्या सत्रात श्रीमती पोर्णिमा पाठक मॅडम यांनी महिलादिनाची गरज व महिलांची पुढिल वाटचाल याबद्दल मत मांडले, तदनंतर डाॅ.सुप्रिया पंतवैद्य यांनी महिलांच्या आरोग्य विषयक समस्या व समस्यांचे निराकरण यावर सखोल मार्गदर्शन केले. स्त्रियांच्या मासिकपाळी संदर्भात घ्यावयाची काळजी व वापरावयाचे सॅनिटरी नॅपकिन याविषयावर दोघांनी उपस्थितांशी मनमोकळे पनाणे संवाद साधत पुढिल आठवड्या पासुन भुपेशभाई पटेल ट्रस्ट मार्फत रोहिणि परिसरातील स्त्रियांसाठी मासीकपाळीत वापरण्यात येणारे कापडी नॅपकिन मोफत पुरविण्याचे सांगितले.श्री.सुनिलभाऊ जैन यांनी परसबाग संकल्पना मांडून उपलब्ध जागेत लागवड करुन आरोग्य निरोगी ठेवण्याच्या सुचना दिल्यात.
तद्नंतर कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांनी एकत्र येवुन संगित अंताक्षरीचा आनंद घेतला.
दुपारच्या सुरुची भोजनानंतर चौथ्या सत्रात जिल्हापरिषद सदस्य कैलास पावरा व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रसन्नकुमार कुलकर्णि यांच्या हस्ते सर्व आशास्वयंमसेवक व आरोग्य कर्मचारीवर्ग तसेच शिरपूर तालुकास्तरीय आरोग्य कर्मचारीवर्ग यांना समर्थ कोव्हिड योध्दे म्हणुन सन्मानित करण्यात आले.तसेच लुपिन फाऊंडेशन वतीने आरोग्य जनजागृती बॅनर प्राथमिक आरोग्य केंद्रास व उपकेंद्रात मोफत देण्यात आलेत.
आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आधार सपकाळे व शिंदे सिस्टर यांनी जेवणाची ,अनिल बंजारा यांनी मंडपाची,संतोष देशपांडे यांनी सत्कार साहित्याचा व सुनिल लांडगे यांनी प्रमाणपत्राचा खर्च स्वेच्छेने केला व त्यांना प्रा.आ.केंद्र रोहिणिच्या सर्व कर्मचारीवर्ग यांचे पाठबळ मिळुन आजचा कार्यक्रम यशस्वी झाला.
   आजच्या कार्यक्रमास जिप सदस्य श्री कैलास पावरा ,पस सदस्य श्री बागल्या पावरा , तालुका  वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रसन्न कुलकर्णि, भुपेशभाई ट्रस्ट च्या वतिने श्रीमती पोर्णिमा पाठक मॅडम ,श्रीमती डाॅ.सुप्रिया पंतवैद्य व श्री सुनिल जैन सरपंच डाॅ.आनद पावरा, उपसरपंच श्री बनुभाऊ बंजारा ,ग्रामसेवक श्री मनोज कुमावत,लुपिन तालुका सन्मन्वयक श्री शैलेन्द्र पाटिल, वैद्यकीय अधिकारी डाॅ.राष्ट्रपालअहिरे ,डाॅ प्रितम माळी,डाॅ.अमोल पवार ,तालुका सहाय्यक श्री वानखेडे नाना व तालुकास्तरीय व प्रा.आ.केंद्र रोहिणि येथिल सर्व आशा व आरोग्य कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने