शिरपूर - किसान विद्या प्रसारक संस्था संचालित डॉ. विजयराव व्ही. रंधे इंग्लिश मेडिअम स्कूल शिरपूर येथे ८ मार्च जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.ताईसाहेब आशाताई रंधे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून श्री एस. पी. बोरसे सर उपस्थित होते.लोकमाता सावित्रीताई रंधे व आईसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण आशाताई रंधे यांच्या हस्ते करण्यात आले तर उदघाटन एस.पी. बोरसे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे ए.ओ. प्रमोद पाटील, प्राचार्या कामिनी पाटील, सारिका ततार उपस्थित होते.या दिवसाचा मुख्यहेतू हा महिला सबलीकरण करणे होय परंतु तो साध्य होतो का?खरे पाहता नवऱ्याने सोडून दिलेल्या बायकोला जेव्हा समाजात स्थान मिळेल किंवा जेव्हा विधवा झालेल्या स्त्रीला समाजात स्थान मिळवून तिला हळदी कुंकवाला बोलण्याची जेव्हा हिंमत करू तो दिवस खऱ्या अर्थाने महिलांचा दिवस असू शकतो.असे प्रतिपादन आशाताई रंधे यांनी केले.या प्रसंगी ममता पाटील, वंदना पाटकरी,शितल चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर यावेळी नुकतेच राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्राप्त महात्मा फुले विदयालयाचे उपमुख्याध्यापक एस. पी. बोरसे सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच महिला शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तर लोकमाता सावित्रीताई रंधे बुद्धिबळ स्पर्धेत सुमारे ४२ विदयार्थी सहभागी होते त्यात प्रथम आम्रपाली रवींद्र खर्चाने द्वितीय ध्रुवांग अजय बोरसे तृतीय प्रणव नंदपुरी गोसावी यांना अनुक्रमये सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी मनीषा लोखंडे, ज्योती देशमुख, मनीषा पाटील, रिदवाना शेख ,सुरेखा चौधरी, स्नेहल पवार, कविता दायमा,विशाल सोनगडे, महेश राजपूत, कन्हय्या कोळी आदी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाधान राजपूत, विजेंद्र जाधव वंदना चौधरी प्रयत्न केले.तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन वंदना पांडे, शितल चव्हाण यांनी केले तर आभार छाया पाटील यांनी व्यक्त केले.
Tags
news
