शिरपूरचा संमेक संजय जगताप याची उत्तर महाराष्ट्राच्या १९ वर्षातील मुलांच्या संघात निवड




शिरपूर : शिरपूरचा संमेक संजय जगताप याची उत्तर महाराष्ट्राच्या १९ वर्षातील मुलांच्या संघात निवड झाली असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

संमेकच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते प्रशिक्षक राकेश बोरसे यांच्याकडून बॅट व संदीप देशमुख यांच्याकडून पॅड व बूट संमेकला देण्यात आले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्यामार्फत दि. ३ मार्च २०२१ ते ६ मार्च २०२१ या कालावधीत उत्तर महाराष्ट्र संघाच्या निवडीसाठी शिरपूर व धुळे येथील मैदानांवर नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांत निमंत्रित १९ वर्षातील मुलांचे साखळी पद्धतीने एक दिवसीय सामने घेण्यात आले. या स्पर्धेत संमेक जगतापने धुळे जिल्ह्याचे नेतृत्व करत स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रात जास्त धावा करण्याचा बहुमान मिळवला. स्पर्धेत संमेकने प्रथम सामन्यात नाशिक संघाविरुद्ध ४९ धावा व ३ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात जळगाव संघाविरुद्ध ३९ धावा व २ गडी बाद केले. अंतिम सामन्यात नंदुरबार संघाविरुद्ध शतकी खेळी करत १२९ धावा व तीन गडी बाद केले. एकूण स्पर्धेत संमेकने ७३. ५६ च्या सरासरीने २१७ धावा केल्या. गोलंदाजीत १५.१३ च्या सरासरीने ८ गडी बाद केले. कुमार संमेक जगतापच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला उत्तर महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळाले आहे. पुढे सदर संघ पुण्यात होणाऱ्या विभागीय स्पर्धेत भाग घेणार असून या स्पर्धेत संमेक आणखी चमकदार कामगिरी करेल असे क्रिकेट तज्ञांनी भवितव्य वर्तविले आहे.

संमेक जगताप मागील सहा वर्षापासून शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन शिरपूरच्या मैदानावर सराव करत असून त्याला क्रिकेट प्रशिक्षक राकेश बोरसेे, संदीप देशमुख, कुणाल गिरासे, चेतस्वीनी राजपूत हे मार्गदर्शन करीत आहेत.

संस्थेचे क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, मुख्य वित्त अधिकारी नाटूसिंह गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांनी कौतुक केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने