जागतिक महिला दिनी कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ, मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे महिला सबलीकरण प्रशिक्षण वर्ग सुरु









 

शिरपूर : जागतिक महिला दिनी कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून "मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट" तर्फे महिला सबलीकरण प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आला.

उद्घाटन सोहळा द्वेता गारमेंट्स मध्ये संपन्न झाला असून तेथील शिवण क्लास मध्ये सर्व लाभार्थी महिला भगिनी यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.
कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी श्री विले पार्ले केळवणी मंडळ सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, एस. व्ही. के. एम. मुंबई ट्रस्टी भार्गवभाई पटेल, एस. व्ही. के. एम. ट्रस्टी विवेकभाई वैद्य, रिटा पटेल, जनकभाई पटेल, रेषा पटेल, शिरपूर नगर परिषदेच्या आरोग्य सभापती नाजेराबी शेख, शिक्षण सभापती रेखा सोनार, नगरसेविका हेमलता गवळी व मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्री बालाजी प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी भार्गवभाई पटेल म्हणाले, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यात विकासासाठी अनेक उद्योग व्यवसाय, उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. द्वेता पटेल हे सुसंस्कृत परिवारातील सुकन्या आहे. त्या चांगले सामाजिक उपक्रम राबवित आहेत. देण्याची वृत्ती असल्याने दानशूर पटेल परिवारातील सर्वच सदस्य समाजसेवेचे कार्य मनापासून करत आहेत. महिलांच्या अडचणी समजून द्वेता दिदी महिलांना व युवतींना स्वावलंबी बनविण्यासाठी काम करताहेत. महिला व युवती यांना आत्मसन्मान टिकविण्यासाठी सक्षम करताहेत. तसेच सॅनिटरी कापडी पॅड उपक्रम बाबत द्वेता पटेल यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

कार्यक्रमात कु. द्वेता पटेल यांचे लिखित मनोगताचे वाचन करण्यात आले.

भूपेशभाई पटेल यावेळी म्हणाले, मुली व महिलांना सक्षम करण्यासाठी द्वेता पटेल विविध उपक्रम राबवित आहे. शिलाई प्रशिक्षण मधून महिला, युवती हे चांगला व्यवसाय करु शकतील. चिंतनभाई पटेल यांचेही सहकार्य महत्त्वाचे आहे. द्वेता गारमेंट्स मध्ये तसेच शिरपूर शहरात देखील शिवण क्लास घेण्यात येत आहे. स्व. पप्पाजी, स्व. मुकेशभाई, स्व. तपनभाई यांच्या स्मरणार्थ समाजसेवेचे काम सतत सुरु आहे. एस. व्ही. के. एम. हॉस्पिटल मार्फत गोरगरिबांना देखील आरोग्य सेवा मिळणार आहे. तसेच मेडिकल कॉलेज मध्ये आपल्या भागातील मुलामुलींना देखील संधी उपलब्ध होणार आहे. उद्योग व्यवसाय विस्तार करण्यात येत आहे. मोठ्यांचा नेहमी सन्मान करा असे आवाहन यावेळी भूपेशभाई पटेल यांनी केले.
प्रास्ताविकात पौर्णिमा पाठक यांनी कु. द्वेता पटेल यांचे महिला व युवती यांच्या साठी महत्त्वपूर्ण कार्याची माहिती दिली. मासिक पाळी साठी कापडी पॅड बाबत महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणत असल्याबाबत तसेच शहरी व ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय महिला, भगिनींना पुढे नेण्यासाठी महिला सबलीकरण कार्यक्रम
व्यापक स्वरूपात घेण्यात येत असल्याचे सांगितले.
शिवणक्लास माध्यमातून महिला युवती यांना आर्थिक पाठबळ दिले जात आहे. त्यांना इन्शुरन्स सेवा देऊन कंपनीमध्ये काम करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. शिलाई मशिन घेण्यासाठी देखील मदत देऊन रोजगार उपलब्ध होईल. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी पटेल परिवार प्रयत्नशील आहे.

कार्यक्रमाला डॉ. सुप्रिया पंतवैद्य, संजय चौधरी, पगारे, सुनील जैन, पौर्णिमा पाठक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने