शिरपूर : दि शिरपूर एज्यूकेशन सोसायटी संचलित अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूल मध्ये प्राचार्य निश्चल नायर व उपप्राचार्या अनिता थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचा सुरवातीला शिक्षक हेमंत देवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन महिला दिनाचे महत्व सांगितले. उपप्राचार्या सौ. अनिता थॉमस यांनी आपल्या जीवनातील महिलांचे महत्व सांगितले व त्यांचा आदर करण्याचा उपदेश दिला. या दिवसा निमित्त विद्यार्थ्यांसाठी महिला कर्तृत्ववावर आधारित ई - प्रश्न मंजूषाचे आयोजन करण्यात आले. त्यात उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना ई - प्रमाणपत्र देण्यात आले. शिक्षिका सौ.भारती सोनवणे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्रचार्या सौ. अनिता थॉमस, समन्वयीका उषा मनोरे, विभाग प्रमुख भारती सोनवणे, शिक्षक हेमंत देवरे, निखिल भावसार, दिपक पाटील, प्रशांत लोहार यांनी प्रयत्न केले.
Tags
news
