शिरपूर येथील पाच शिक्षक राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित




शिरपूर : येथील पाच शिक्षक राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.

दि. 7 मार्च रोजी जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटी व कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव निमित्ताने शहरातील गरुड जिल्हा वाचनालयात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक विनायक शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, क्रीडा मार्गदर्शक गुरुदत्त चव्हाण, प्रा.नरेंद्र पाटील, कबड्डी खेळाडू महेंद्र राजपूत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 56 शिक्षक, प्राध्यापक यांना शिक्षण, क्रीडा सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यात आर. सी. पटेल शैक्षणिक संस्थेतील एकूण पाच शिक्षकांना गौरविण्यात आले. त्यात सुभाष हिरामण निकुंभ (क्रीडाशिक्षक, भोरखेडा) व महेंद्र भिकन माळी (उपशिक्षक, आर. सी. पटेल प्राथमिक शाळा शिरपूर) यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर एस. व्ही. के. एम. संस्थेतील तीन क्रीडा शिक्षिकांना राज्यस्तरीय राजमाता माँसाहेब जिजाऊ जीवन गौरव  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात मयुरी राजेश भामरे (कॅरम कोच), ज्योत्स्ना ईश्वर जाधव, पुजा भोगिलाल जैन यांचा सन्मान करण्यात आला.

पुरस्कार वितरणाचे संयोजन कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती संस्थापक अध्यक्ष हेमंत भदाणे, उपाध्यक्ष वासुदेव शेलकर, सहसचिव सी. जी.वारुडे, मनोहर चौधरी, धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष योगेश वाघ, संभाजी बोरसे, सुनील वाघ, संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शिवाजी बाविस्कर यांनी केले.

पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे आमदार अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य, 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने