शिंदखेडा / शिरपूर (प्रतिनिधी) : नुकत्याच धुळे जिल्हा ग्रामीण मधील शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघातील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आर्शिवादाने पक्षप्रमुख श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते खासदार श्री. संजय राऊतसाहेब, उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री. रविंद्र मिर्लेकर साहेब व धुळे जिल्हा संपर्क प्रमुख श्री. बबनराव थोरातसाहेब यांच्या मार्गदर्शनाने खालील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा संघटक : ज्योती सिसोदे (धुळे ग्रामीण), उपजिल्हा संघटक : वीणा वैद्य (शिरपूर विधानसभा), तालुका संघटक : अर्चना देसले (शिरपूर तालुका), विधानसभा संघटक : लक्ष्मी कोकणी (शिरपूर). नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्री. अतुल सोनवणे व जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, भरतसिंग राजपुत, जिल्हा संघटक मंगेश पवार, तालुका प्रमुख गिरीश देसले, भाईदास पाटील, दोंडाईचा कृ.उ.बा.स.संचालक सर्जेराव पाटील, कल्याण बागल, विभाभाई जोगराणा, दोंडाईचा युवासेना प्रमुख चेतन राजपुत, शिंदखेडा शहर प्रमुख सागर देसले, शिरपूर शहर प्रमुख मनोज धनगर, राजु टेलर, छोटू राजपुत, महिला आघाडीच्या विजयाताई ठाकूर, ज्योतीताई पाटील, विजयाताई मराठे, सुनंदाताई पवार, सरिताताई महाजन यांनी अभिनंदन केले आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा विचार घराघरापर्यंत पोहचविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
