तेजस फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे लघु चित्रपट आणि समाजभूषण सोहळ्याचे उद्घाटन मंगळवार दिनांक १६.०३.२०२१ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर, हडको, औरंगाबाद येथे ज्येष्ठ साहित्यिक तसेच दैनिक सकाळचे संपादक उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रम सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ ऋषिकेश कांबळे (आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार,समीक्षक,विचारवंत - औरंगाबाद) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रा.डॉ.बापूराव देसाई (महाराष्ट्राचे पहिले हिंदी भाषिक डी.लिट.,लेखक, मराठी,हिंदी अहिराणी संघ.,नाशिक), महेश्वर तेटांबे (सिने-नाट्य अभिनेते,दिग्दर्शक,पत्रकार), संदीप जाधव (अभिनेते), वैभव कालखैर,आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पंकज शिंदे यांनी स्वीकारली आहे. याप्रसंगी महाराष्ट्रातून विविध स्तरातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणिजनांची योग्य टी दाखल घेऊन संस्थेतर्फे त्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान करणार आहोत. त्याचप्रमाणे राज्यभरातून जे लघु चित्रपट परीक्षणासाठी आले होते त्यातील निवडक अशा तीन लघुचित्रपटांना आणि दोन उत्तेजनार्थ लघुचित्रपटांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तेव्हा कोरोनाच्या पार्श्वभूमी वर आणि सोशल डिस्टन्सिन्गचे भान ठेवून या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्षा मेघा डोळस यांनी केले आहे.
