पुणे जिल्हा परिषद यांसकडून विविध भजनी मंडळांना साहित्याचे वाटप सध्या केले जात आहे आज दौंड तालुक्यात पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने आलेल्या पेटी, पखवाद, वीणा व टाळ यांचे वाटप जिल्हा परिषद सदस्य श्री गणेश कदम यांच्या हस्ते श्री. काळभैरवनाथ जेष्ठ नागरीक सेवा संघाला करण्यात आले
संघाचे पदाधिकारी डॉ श्याम कुलकर्णी यांचेकडे ते सुपुर्द करण्यात आले
संघाचे अध्यक्ष श्री जनार्दन चांदगुडे यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच यासाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे व जिल्हा परिषद सदस्य यांचे आभार व्यक्त केले
यावेळी पंचायत समिती सदस्या
सौ निशाताई शेंडगे, सरपंच समीर दोरगे, उपसरंपच सुभाष यादव, बबनआबा दोरगे, सदस्य सदानंद दोरगे ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते यासाठी उपस्थित मान्यवरांचे संघाचे सचिव श्री.रमेश यादव यांनी आभार मानले
साहित्य मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांनी भजन करुन कार्यक्रमाची सांगता केली
Tags
news
