हस्तीचे कब मास्टर नरेश सावंत यांचे ' असि. लिडर ट्रेनर ' प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण



(प्रभाकर आडगाळे )

*दोंडाईचा वि.प्र.* हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज, दोंडाईचा येथील कब मास्टर नरेश सावंत यांनी ' असि. लिडर ट्रेनर ' प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केला. सदर प्रशिक्षण कोर्सचे आयोजन दि. २ते ८मार्च २०२१ दरम्यान नॅशनल ट्रेनिंग सेंटर, पंचमढी - मध्यप्रदेश येथे भारत स्काऊट गाईड संघटनेतर्फे करण्यात आले होते.

या प्रशिक्षणात संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या राज्यातील ६५ कब व स्काउट मास्टर सहभागी झाले होते. यात महाराष्ट्रातून धुळे जिल्ह्यातील हस्ती स्कूलचे कब मास्टर नरेश सावंत यांची ' कब असि. लिडर ट्रेनर प्रशिक्षणासाठी व अन्य शाळेतील एका शिक्षकाची स्काऊट असि. लिडर ट्रेनर प्रशिक्षणासाठी  निवड करण्यात आली होती. कब मास्टर नरेश सावंत यांनी या प्रशिक्षणात कब मास्टर बेसिक व प्रगत प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांना मार्गदर्शन करणे, निसर्ग निवास शिबीर व स्काऊट गाईड उपक्रम आणि कार्यक्रम यांचे नियोजन करणे याबाबतचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

विशेषत: हस्तीचे कब मास्टर नरेश सावंत यांनी धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांमधील ' एकमेव कब असि. लिडर ट्रेनर ' असल्याचा बहुमान प्राप्त केला आहे!

नरेश सावंत हे गेल्या पाच वर्षापासून हस्ती स्कूल येथे सेवारत आहेत. ते सातत्याने स्काऊट गाईड चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रूजावी; यासाठी चळवळीचे विविध उपक्रम व प्रशिक्षण शिबीरांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होणेस प्रोत्साहित करून मार्गदर्शनही करतात.  तसेच सावंत यांनी आपल्या मालपूर गावी युवकांमध्ये राष्ट्रप्रेम व देशभक्ती जागरूकतेसाठी  ' युवा बाँर्डर गृप ' स्थापन केला आहे. या गृपतर्फे विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

हस्तीचे कब मास्टर नरेश सावंत यांनी ' कब असि. लिडर ट्रेनर ' प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. यास्तव त्यांचे हस्ती स्कूल शालेय समिती चेअरमन कैलास जैन, समिती सदस्य डॉ. विजय नामजोशी तसेच प्राचार्य हरिकृष्ण निगम व स्काऊट गाईड विभाग प्रमुख किशोर गुरव सोबतच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने