शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात आज दिनांक 18 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी अचानकपणे छापा टाकून कारवाई केली या कारवाईत या विभागातील दुय्यम निबंधक का सह खाजगी इसमाला 300 रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली असून याकामी जाब ,जबाब व साक्षीपुरावे यासह गुन्हा नोंद करण्याचे काम शिरपूर पोलिस स्टेशनला दुपारपर्यंत सुरू होते. यामुळे या परिसरात अचानक खळबळ माजली व सदरची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली .
यात प्राप्त झालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील नोंदणी व मुद्रांक विभाग येथील दुय्यम निबंधक श्रेणी-1 येथील कार्यालयातील दुय्यम निबंधक अरुण संभाजी कापडणे वय 54 व खाजगी इसम सुनील उर्फ छोटू बाविस्कर 43 राहणार वाघाडी तालुका शिरपूर यांनी तक्रारदार वकील यांच्याकडून पक्षकाराचे खरेदीखत रजिस्टर नोंदणी करावयाची असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तूर या नात्याने नोंदणी करता गेले असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे नोंदणी च्या बदल्यात 400 रुपयांची मागणी केली त्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली असता तडजोडी अंती 300 रुपयाची लाच घेताना दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे .
सदरची कारवाई सुनील कडासने पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, निलेश सोनवणे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक, सुनील कुराडे पोलीस उप अधीक्षक धुळे, विजय जाधव पोलीस उपाधीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी मंजितसिंग चव्हाण पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे सहाय्यक सापडा अधिकारी प्रकाश झोडगे पोलीस निरीक्षक धुळे ,सापला पथक सुधीर सोनवणे कृष्णकांत वाडीले, संदीप सरगम ,भूषण खलाने कर ,भूषण शेटे इत्यादींच्या पथकाने केली आहेत
Tags
news