शिरपूर : धुळे जिल्ह्यात कोरोना लसीकरणात वाढ करुन लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी तसेच वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार, छायाचित्रकार बांधवांची समाजात निरनिराळ्या ठिकाणच्या व्यक्तींसोबत संपर्क येतो. त्यामुळे सर्व पत्रकार बांधवांना सुध्दा कोविशिल्ड लस देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांचा वतीने उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील-भामरे यांनी (दि. १८ मार्च) रोजी स्विकारले. निवेदनाची प्रत विधानसभा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांना पाठवण्यात आल्या आहेत. धुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. तसेच कोरोना रुग्णांची झालेली वाढ लक्षात घेता शासनाद्वारे कडक निर्बंध लादण्यात आले असून दोषींवर कार्यावाही केली जात आहे, परंतु रुग्ण संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोमाने राबविणे गरजेचे आहे असे अरुण धोबी यांनी निवेदनात म्हटले आहे. नागरिकांच्या जिविताची काळजी घेणेच्या दृष्टीने वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता लसीकरण केंद्र वाढवावीत तसेच जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना लस मिळाल्यास संसर्ग रोखण्यास व जनसेवेचे कार्य विना अडथळा सुरू राहण्यास मदत होईल. तरी सदर बाब लक्षात घेता धुळे जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे व संबधीतास योग्य ते निर्देश व्हावेत अशी मागणी भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी धुळे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
Tags
news