चुणाडे सुराय ते खर्दे रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन, दोंडाईचा प्रहार चा इशारा



दोंडाईचा - चुणाडे सुराय ते खर्दे रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दोंडाईचा प्रहार  संघटना यांनी दिला आहे.
चुणाडे सुराय ते खर्दे रस्ते खराब अवस्तथेत असून कार्यकारी अभियंता सो धुळे जिल्हा
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना याना हे निवेदन दिले आहे.
या रस्त्याची सुधारणा व चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. चुणाडे व सुराय खर्दे रस्ते खराब झाले असुन 2ते3वर्षात मोठ मोठे खड्डे पडायला लागले म्हणुन सदर रस्त्याचे ठेकेदार व शासकिय अभियंता यांनी आपल्या कामात कामचुकार पना केला व शासणाची फसवणुक केली आहे. वारंवार या रस्त्यावर शासकीय खर्च दाखवण्यात येतो मात्र कामे केली जात नाही.म्हणुन आज रोजी हे रस्ते खराब झाले आहेत तरी सगळे रस्त्याची दुरूस्ती 8 दिवसाच्या आत करावी व चौकशी व्हावी अशी मागणी प्रहार चे अध्यक्ष पंकजभाऊ सिसोदिया उपअध्यक्ष सोनू दादा शेतकरी नेते लालसिग राम गिरासे ता सहसचिव हितेश पाटील शहर अध्यक्ष पंकज चौधरी ग्रामिणचे किशोर सिसोदिया यांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने