शिरपूर : माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल, आ. काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने, न्यू बोराडी येथील महिलेची ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाच्या कॅन्सर) ची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या संपन्न झाली असून रुग्ण व नातेवाईकांनी पटेल परिवाराला प्रत्यक्ष भेटून धन्यवाद दिले.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे नेहमीच आरोग्य सेवा तत्परतेने बजावणारे तसेच शिरपूर शहर व तालुक्यातील गरजू रुग्णांना नेहमी मदतीचा हात देणारे पटेल परिवार हे हजारो रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत.
न्यू बोराडी येथील रुग्ण सौ. सिंधुबाई मगन पावरा (वय 47 वर्षे) ही ब्रेस्ट कॅन्सर या क्रिटिकल आजाराने ग्रासलेली असतांना व अनेक त्रास भोगत असतांना पटेल परिवाराने मदतीचा हात देऊन यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करवून दिल्या. नाशिक येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करून येथील या महिलेला जीवदान मिळाल्याबद्दल न्यू बोराडी येथील नातेवाईक यांनी जनक व्हीला निवासस्थानी मंगळवारी दि. २ मार्च रोजी सकाळी शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांना भेटून आभार मानले. भूपेशभाई पटेल यांनी महिलेवर उपचार करण्यासाठी फार प्रयत्न केले. यावेळी एस. व्ही. क. एम. संस्थेचे ट्रस्टी भार्गवभाई पटेल, विवेक वैद्य, न्यू बोराडी येथील महिलेचे नातेवाईक, मगन घनसिंग पावरा, दिलीप माळी उपस्थित होते.
