कै. नानासो. स्वा. सै. शंकर पांडू माळी यांच्या १५ व्या स्मृती निमित्त ७० गरजू वृध्द महिलांना साड्या वाटप व पाणपोईचे उद्घाटन



शिरपूर : कै. नानासो. स्वा. सै. शंकर पांडू माळी यांच्या १५ वा स्मृती दिवसा निमित्त ७० गरजू वृध्द महिलांना साड्या वाटप व पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

शंकुतला लाॅन्सजवळ पाणपोईचे उद्घाटन शिरपूर वरवाडे नगर परिषचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्वा. सै. शंकरनाना मंगल कार्यालयात शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते ७० गरजू वृध्द महिलांना साड्या वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष व नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण, मुख्याधिकारी अमोल बागुल, माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी, विधितज्ञ अॅड. एस. आर. सोनवणे, वसंत देवरे, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, नगरसेवक भुरा राजपूत, चंद्रकात सोनवणे, संतोष महारु माळी होते.

कार्यक्रमाचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे यांनी केले. या स्मृतीदिनानिमित्त परिसरातील ७० गरजू वृध्द महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.
या प्रसंगी प्रभाकरराव चव्हाण, अमोल बागुल यांनी मनोगत व्यक्त केले.
आमदार काशिराम पावरा अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. शंकर नाना माळी यांची आठवण कायम रहावी म्हणून वासुदेव देवरे नियमितपणे सामाजिक कार्यक्रम घेतात ही अभिमानाची बाब आहे. ते दरवर्षी डोळे तपासणी शिबीर घेत होते. परंतु, या कोरोना काळात गरजू महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम घेतला, ही आदर्श बाब आहे.

कार्यक्रमाला कैलास माळी, बाजीराव महाले, भरत रोकडे, कळमसरे पोलिस पाटील विनय माळी, वसंत माळी, संतोष चिंतामण माळी, विजय बागुल, अविनाश माळी, डाॅ. कैलास जगताप, विनायक कोळी, मोहन कोळी, सुभाष कोळी, सोमनाथ धनगर, प्यारे मोहन, रणजीत कोळी, संदिप कोळी, दिनेश माळी, भटू जैन, राजू सैनी कार्यक्रमाला उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. जे. सोनवणे यांनी केले. आभार वासुदेव देवरे यांनी आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने