शिरपूरचे तहसीलदार, साहित्यिक आबा महाजन यांना साहित्य अकादमीचा 'बाल साहित्य पुरस्कार' जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव




शिरपूर : शिरपूरचे तहसीलदार, साहित्यिक आबा महाजन यांना साहित्य अकादमीचा 'बाल साहित्य पुरस्कार'  जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण, शहरातील सुप्रसिद्ध विधितज्ञ ॲड. सुरेश सोनवणे, राधेशाम दायमा, अनेक पदाधिकारी यांनी शनिवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी शिरपूर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार आबा महाजन यांचा सत्कार करुन त्यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव केला.

तसेच शासनाचे अनेक अधिकारी, प्रशासनातील बडे अधिकारी, पी. ए., अनेक राजकीय पदाधिकारी यांनीदेखील भ्रमणध्वनीवरून त्यांना शुभेच्छा दिल्या.

साहित्य अकादमी पुरस्कार २०२० ची घोषणा करण्यात आली असून सुप्रसिद्ध बाल साहित्यिक, शिरपूरचे तहसीलदार आबा गोविंदा महाजन यांच्या 'आबाची गोष्ट' या लघुकथा संग्रहास साहित्य अकादमीचा 'बाल साहित्य पुरस्कार' आज जाहीर झाला आहे. ५० हजार रूपये, ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

तहसीलदार आबा महाजन हे प्रशासनात अतिशय कुशल अधिकारी असून सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्माला आले आहेत. त्यांनी आतापर्यंत "लई मज्जा रे", "टांगा टोली", "मन्हा मामाना गावले जाऊ", ठोंब्या" असे अनेक कथासंग्रह पुस्तकांच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले असून नुकतेच "आबाची गोष्ट" या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी साहित्य अकादमीच्या वतीने बाल साहित्य पुरस्कार म्हणून त्यांना गौरविण्यात आले. खानदेश च्या दृष्टीने व शिरपूर येथील तहसीलदार म्हणून ही सर्वांसाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले आबा महाजन यांना साहित्य लेखन, वाचन याची मनापासून आवड आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांनी वाचन लेखन करावे, त्यांना साहित्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी तहसीलदार आबा महाजन यांना नेहमी वाटते.
बाबाची गोष्ट आहे पुस्तक सर्वांच्या दृष्टीने व मुलांच्या दृष्टीने बोधकथा आहे. आबाची गोष्ट हा कथासंग्रह चिमुकल्यांसाठी तसेच सर्वच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक आहे. तहसीलदार आबा महाजन यांनी लिहिलेली सर्व पुस्तके अतिशय सोप्या भाषेत असून खानदेश ला भूषण वाटावे असे त्यांचे बोधपर लेखन आहे. कोणत्याही वयोगटातील मुला-मुलींना गोष्टी ऐकायला व सांगायला नेहमी आवडते, याबाबत विचार करून आबा महाजन यांनी अतिशय साधा सरळ भाषेतून लिहिलेल्या या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार म्हणजे खानदेश वासियांच्या गौरवच आहे. त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून व विशेष करून या पुस्तकातून मुला-मुलींना संस्काराचे गाठोडे मिळणार आहे. कोणत्याही संकटाचा कसा सामना करायचा, आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीतून धडपड करत संकटांचा सामना करत कोणतेही आव्हान स्वीकारून जीवनात यशस्वी कसे व्हावे, असे अनेक छोटे-मोठे उदाहरणातून मुला-मुलींना घडविण्याचा प्रयत्न आपल्या लिखाणातून आबा महाजन यांनी निश्चितच केल्याचे दिसून येते.
शिक्षक ते प्रशासनातील अभ्यासू, हुशार व कुशल अधिकारी असा प्रवास असलेले तहसीलदार आबा महाजन यांचे आबाची गोष्ट व इतर पुस्तके सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने