शिरपूर : शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन शिरपूरच्या खेळाडूंनी आपल्या खेळाच्या यशोगाथेत सातत्य ठेवून २०२० -२१ या शैक्षणिक वर्षात असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल संस्थास्तरीय गौरव व शुभेच्छा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
शिरपूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रथम व तृतीय क्रमांक मिळविलेल्या शिरपूरच्या क्रिकेट संघातील खेळाडू संमेक जगताप, प्रदीप शार्दुल, मयुरेश पवार, जय माळी, निखिल राजपूत, अनिकेत आर्या, भावेश शर्मा, मृदुल शिंदे, प्रथम पटेल, पार्थ खैरनार, हेमंत पवार, अक्षय पवार, जयेश लोखंडे, प्रणव महाले, दीपक पवार, हिमांशू धनगर, वरद पंचभाई, ऋषी अग्रवाल, तेजस पाटील, अनिनंद सोनवणे, भावेश मोरे, यश माळी, कार्तिक पाटील, कुणाल बंजारा, समर्थ चौधरी, कार्तिक पाटील, ओम राजपूत खेळाडूंना संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते हायजीनिक थर्मो वॉटर बॉटल भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या.
तसेच जिल्हा क्रिकेट असोसिएशन धुळे आयोजित विंटर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक तर मध्यप्रदेश राज्यात घेण्यात आलेल्या निमंत्रित खेल महोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक व ग्रीन हिल क्रिकेट स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यास संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील, एस. बी. पवार, सी.डी.पाटील, क्रीडा समन्वयक राकेश बोरसे, Please add this line
क्रिकेट प्रशिक्षक श्री संदीप देशमुख कुणाल गिरासे व चेतस्विनी राजपूत उपस्थित होते.
शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन शिरपूरचे सर्व यशस्वी खेळाडुंचे संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, वित्त अधिकारी नाटूसिंह गिरासे, सीईओ डॉ. उमेश शर्मा, संचालक मंडळ, प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांनी कौतुक केले.
Tags
news
