शिरपूर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत सरपंच/उपसरपंच पदासाठी आज निवड घेण्यात आली, ज्यात बोरगांव ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी काशिबाई तानकू भिल तर उपसरपंच पदी योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया यांची बिनविरोध निवड झाली. पॅनल प्रमुख योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या नेतृत्वाखाली मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील पूर्ण पॅनल निवडून आले होते, ह्या वर्षी ते स्वतः उभे होते. स्त्री राखीव जागा असल्याकारणाने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. श्री सिसोदिया हे नामंकित झी गोल्ड कंपनींचे मॅनेजर आहेत तसेच बोरगांव वि. का. सोसायटीचे संचालक देखील आहेत.
गावांतील बिनविरोध निवडीबद्दल मा मंत्री श्री अमरिशभाई पटेल, आमदार श्री काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष श्री भुपेशभाई पटेल, जि. प. अध्यक्ष श्री तुषार रंधे यांनी अभिनंदन
केले आहे.
यावेळी ग्रा पं सदस्य पांडुरंग कोळी, तानकु भिल, विमलबाई दीपक राजपूत तसेच गावातील माजी सैनिक दगेसिंग राजपूत, माजी सरपंच रघुनाथ झुलाल कोळी, नारायण लकडू राजपूत, गोकुळ येशी, विठ्ठल कोळी, प्रकाश न्हावी, आनंदसिंग राजपूत, कौतीक न्हावी, धुडकु भिल, गोपीचंद भिल, अनिल पाटील, बापू भिल, दीपक पदमसिंग राजपूत, धनसिंग राजपूत, नवलसिंग राजपूत व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
news


