आज रोजी शिरपूर तालुक्यातील उर्वरित १७ ग्राम पंचायतींचे सरपंच/उपसरपंच पदांची निवड झाली. ज्या मध्ये बोरगांव ग्रा. पं. तीच्या सरपंच पदी काशिबाई भिल तर उपसरपंच पदी योगेंद्रसिंग सिसोदिया यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान निवडीनंतर उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या संकल्पनेतून बिनविरोध सरपंच/उपसरपंच निवड झाल्याबद्दल गावात वृक्षारोपण केले तसेच पुढील ५ वर्ष वृक्षाचे संगोपन करण्याचा हि संकल्प उपसरपंचांनी केला. येत्या काळात गावात ग्राम पंचायतींमार्फत २००० झाडे लावण्याचाही मानस त्यांनी बोलून दाखविला.
बोरगांव ग्राम पंचायतीच्या ह्या अभिनव उपक्रमाबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. वृक्षारोपण दरम्यान गावातील माजी सैनिक दगेसिंग राजपूत विठ्ठल झुलाल कोळी, गुलाब फुलं भिल, धुडकु तानकु भिल व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
news
