नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:आज दिनांक 12/2/2021 शुक्रवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राज्य नेते ऍड.सुमेध गायसमुद्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गृहविभाग तसेच राज्याचे सचिव यांची मंत्रालयात भेट घेऊन वरील मागणी केली
नुकताच उत्तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संपर्कप्रमुख अनिलभाई गांगुर्डे यांच्या मुलावर गुंडांकडून हल्ला झाला होता ह्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी रिपाईच्या कार्यकर्त्यांकडून निषेध निवेदन देऊन महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे व त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे.निवेदनात म्हटले आहे की रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून मी व माझें कुटुंब तळागाळातील गोरगरिब शेतकरी, मजुर व वचिंत घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी निवेदनद्वारे व लोकशाही मार्गाने आदोंलन उभे करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे मी व पत्नी पोलीस आयुक्तालय शांतता समिती कमिटी च्या सदस्य म्हणून काम करत असताना आम्ही गुंङगिरी प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधात आवाज उठवला असल्याने माझ्या मुलाला गुङांकरवी मारहाण झाली आहे मानवाच्या कल्याणासाठी मी व माझें कुटुंब सतत आवाज उठवत राहु त्या अनुषंगाने मला व माझ्या कुटुंबातील व्यक्ती यांना गुंड प्रवृत्तीच्या तसेच राजकीय हितशञु धोका निर्माण झाला असुन माझ्या मुलावर झालेल्या प्राण घातक हल्ला यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे
Tags
news
