शिरपूर : आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशांत जगन्नाथ चौधरी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव तर्फे दि. २३ जानेवारी २०२१ रोजी पीएच. डी. प्रदान करण्यात आली.
प्रा. प्रशांत जगन्नाथ चौधरी यांनी "डिझाईन, सिंथेसिस अँड बायो इव्हाल्युशन ऑफ एन-हेटेरोसायक्लिक्स एज अँटी कॅन्सर एजन्ट्स" या शीर्षक अंतर्गत डॉ. एस. बी. बारी (प्राचार्य एच. आर. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर केला. या संशोधनात त्यांनी कॅन्सर या आजारावर उपचारा साठी कम्प्युटर एडेड ड्रग डिस्कव्हरी व ग्रीन सिन्थेसिस च्या माध्यमातून नवीन मॉलेक्युलस चा शोध लावला. शोधप्रबंधा वर आधारीत त्यांनी ५ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. प्रा प्रशांत जगन्नाथ चौधरी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव च्या विद्यापीठ स्तरीय अविष्कार २०१३, २०१६, व २०१८ स्पर्धे मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ संशोधन स्पर्धा 'अविष्कार' मध्ये दापोली, नागपूर व राहुरी येथे या संशोधनाचे सादरीकरण करून फार्मसी विभागातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव चे प्रतिनिधीत्व केले होते. तसेच संशोधनाचा काही भाग त्यांनी मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्यान देऊन सादर केला. त्यासाठी त्यांना विद्यापीठा कडून इंटरनॅशनल ट्रॅव्हल ग्रँट मिळाले आहे.
त्यांच्या कॅन्सर वरील या रिसर्च साठी यू. जी. सी., नवी दिल्ली व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव मार्फत अनुदान प्राप्त झाले होते. डॉ. प्रशांत जगन्नाथ चौधरी यांचे आतापर्यंत १२ आंतराष्ट्रीय, ७ राष्ट्रीय शोधनिबंध, १ बुक प्रकाशित झाले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एजुकेशन सोसायटी अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, सर्व संचालक, आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार बारी, डिप्लोमा फार्मसी चे प्राचार्य डॉ. नितीन हासवाणी, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Tags
news
