अखिल भारतीय किसान सभेचा रास्ता रोको आंदोलन दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा , शिरपूर चोपडा रोडवर केले आंदोलन




 शिरपूर प्रतिनिधी-  अखिल भारतीय किसान सभा तर्फे आज रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे, सरकारने चार ही आंदोलन स्थळावर प्रचंड पोलिस बळ लावले  आहे, आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, इंटरनेट, अन्नपदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करून तोडण्यात आला आहे. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय असून संयुक्त किसान मोर्चा अखिल भारतीय किसान सभा सरकारच्या दडपशाहीच्या तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. आणि म्हणून आज  रोजी त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीच्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून  देशव्यापी आंदोलन करण्याचे आवाहन किसान सभेने केले होते. त्यानुसार धुळे जिल्हा किसान सभा तर्फे आज रोजी हिंसाळे बस स्टँड शेजारी शिरपूर चोपडा रोड वर सकाळी 11 वा. शेतकरी आंदोलन केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरीविरोधी तीन ही कायदे रद्द करा शेतकऱ्यांना किमान आधार भावाच्या कायदा मंजूर करा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करा यासह स्थानिक समस्या याबाबत मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. याबाबत थाळनेर पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे याना निवेदन देण्यात आले होते.
. या वेळी भाकपचे तालुका सेक्रेटरी एडवोकेट संतोष पाटील व धुळे जिल्हा किसान सभा अध्यक्ष एडवोकेट हिरालाल परदेशी , साहेबराव पाटील, वसंत पाटील, अर्जुन कोळी, किशोर सूर्यवंशी, रामचंद्र पाटील, प्रमोद पाटील, जानकी राम परदेशी, कवरलाल कोळी, प्रकाश पाटील, कैलास पाटील, कलाकार पाटील, शांतीलाल परदेशी इ उपस्तीतीथी होती.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने