शिरपूर : माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल, आ. काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने वाठोडे येथील १० वर्षीय अर्चना भिल या चिमुकलीची ब्रेन ट्यूमरची यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली.
वाठोडे येथील १० वर्षीय अर्चना भिल या चिमुकलीची ब्रेन ट्यूमर म्हणजेच तिच्या मेंदू जवळ गाठ होती तसेच तिच्या कानाच्या पडद्या जवळ हाड कुजलेले होते. अशा अनेक क्रिटिकल आजारांनी ती ग्रासलेली असतांना व अनेक त्रास भोगत असतांना पटेल परिवाराने तिला व तिच्या पालकांना मदतीचा हात देऊन तिचे यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करवून दिल्या.
मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करून येथील या बालिकेला जीवदान मिळाल्याबद्दल वाठोडा ग्रामस्थांनी पटेल परिवाराचे भेटून आभार मानले. जनक विला निवासस्थानी शुक्रवारी दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांना भेटून वाठोडे येथील सरपंच नारायणसिंग चौधरी, सामाजिक कार्यकर्ता लाला गिरासे, ग्रामपंचायत सदस्य देवा भिल, सजन भिल यांच्यासह रुग्ण अर्चना भिल व तिचे वडील युवराज भिल यांनी ऋण व्यक्त केले.
वाठोडा येथील सामाजिक कार्यकर्ते लालाभाऊ गिरासे यांनी अर्चना युवराज भिल व तिचे वडील युवराज भिल (राहणार वाठोडा ता. शिरपूर) यांची भेट करुन दिली होती. त्यानंतर भूपेशभाई पटेल लगेचच तिच्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.अतुल गोयल (न्युरो सर्जन) याांनी सर्व तपासण्या करुन ब्रेन चे ऑपरेशन यशस्वीपणे केले. त्यानंतर दुसरे ऑपरेशन कानाचे करण्यात आले ते 26 दिवसानंतर. कानाचे सर्जन डाॅ. हेमलता मारफीया, डाॅ. धनश्री मॅडम, डाॅ. पंकज पाटील या तीन डॉक्टर्स ने ऑपरेशन केले. पेशंट व त्याचे आई, वडील हे एक महिना दहा दिवस पर्यंत हॉस्पिटल मध्ये होते. त्यांची सर्व व्यवस्था भूपेशभाई पटेल यांनी करुन दिली होती. पूर्णपणे मोफत करुन देण्यात आले.
यासाठी रुग्णमित्र दिलीप माळी यांचे सहकार्य लाभले.
Tags
news
