कृष्णा कोळी शाहादा 9823983435 प्रतिनिधी:-शहादा तालुक्यातील असलोद ग्रा.प.वर आमदार राजेश पाडवी व दिपकभाई पटेल याच्या नेतृत्वात संरपच पदी सुशीला भिल तर उपसरपच पदी विलास पवार याची निवड करण्यात आल्याने भारतीय जनता पार्टीची सत्ता असलोद ग्रा.प.तीवर स्थापन झाली आहे.या निवडीनंतर गावात आनंदाची लहर पसरली असुन तरुनानमधे मोठा उत्साह निर्माण झाला आहे असलोद गावात बऱ्याच वर्षानंतर ग्रा.प.तीत बीजेपीची एकहाती सत्ता स्थापन होत असल्याने गावातील बीजेपीच्या कार्यकर्त्यानमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.असलोद गावात काॅग्रेस पंक्षाचे व राष्ट्रवादी पक्षाचे,जिल्हा व तालुकास्तरावर मोठे कार्यकर्ते होते अशा परिस्थितीत असलोद गावात आमदार राजेश पाडवी व दिपक भाई यांनी वेळोवळी बीजेपीच्या कार्यकर्त्यानशी सर्पक ठेवुन पुण्याहुन लाॅकडावुन काळात आलेल्या शिक्षीत युवकाशी संगनमत. करुन असलोद गावातील नवयुकांना त्यांनी पाठीबा दिला व गावातील तरुण युवकाचा बीएसपी पॅनल बहुमताने निवडुन आणला त्यानी या निवडणुकीत सर्व गाव गुण्यागोविंदाने एकत्रित कसे राहील व पराभुत उमेदवार व विजयी उमेदवार गावात विकास कामे कशा पध्दतीने होतील या फार्मुल्यावर पकड ठेवुन सर्वाना विकास कामावर कशा पध्दतीने भर देता येईल यावर आपण सर्वजन एकत्रीत कामे करावी असे तरुनाना सागीतले होते.त्याच्या विकास कामाच्या आश्वासनाच्या जोरावर व मार्गदर्शनामुळे बीएसपी पॅनल प्रमुख राजु वानखेडे यांनी ग्रामपंचातीच्या निवडणुकीत सर्वात मोठी वीवरचना आखुन सर्व असलोद गावातील जनतेला विश्वासात घेवुन निवडणुकीत बीएसपीचे अकरा जागा पैकी आठ उमेदवार निवडुन आणले व असलोद गावात आज असलोद ग्रा.प.तीवर बीजेपीची सत्ता स्थापन करण्यात त्याना असलोद गावकऱ्याना व तरुनाना येश आले आहे.
*गावाच्या विकास कामानसाठी एक संघ राहु:-आमदार राजेश पाडवी*
निवडणुक होण्या अगोदर बीएसपीच्या सर्व उमेदवारानी आमदार राजेश पाडवी याच्या शहादा कार्यालयात भेट घेतली या भेटी दरम्या भवीष्यात आपण पक्ष वाढीसाठी व गावाच्या सर्वांगीण विकासाठी सर्वानी एकजुटीने कामे करावी लागतील माझ्या कडुन तुमाला जी कामाची आश्र्वासने दिली आहेत ती शभ्भर टक्के पुर्ण करण्याचा प्रयत्न करु तसेच येणाऱ्या चार वर्षात जेवढा जास्तीत असलोद गावाच्या विकासासाठी निधी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार विकास कामे करताना संरपच उप सरपंच सर्व सदस्याना व गावकऱ्यांना विश्वासात घेवुन कामे करावी असे सर्वाना भेटी दरम्यान सागीतले.यावेळी बीएसपीचे सचीव विलास पवार यांनी आमदार राजेश पाडवी साहेब यांच्या पाठीशी आम्ही सर्व गावकरी एकजुटीने राहु असे सांगितले.
*याची झाली सरपच उपसरपच निवड*
निवडणुकीत सरपच पद स्त्री राखीव असल्याने त्या जागेवर सौ सुशिला प्रकाश भिल याचा फार्म भरला तर उपसरपंच पदासाठी विलास पवार याचा फार्म भरला सरपंच उपसरपंच पदासाठी दोन फार्म भरल्या नंतर ईतर कोणीही फार्म भरला नसल्याने बीनवीरोध निवड करण्यात आली.निवडणुकीत अकरा सदस्यानपैकी नऊ सदस्यानी भाग घेतला व दोन सदस्य गैरहजर राहीले बाकी सर्व सदस्याचे योगदान लाभले.निवडुन आलेल्या सरपच उपसरपच याच्यावर गावाच्या वतीने व बीएसपी फाऊंडेशनच्या वतीने शुभेच्छाचा वर्षाव झाला.
Tags
news
