बालकुवा - शिरपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता माधवराव फुलचंद दोरीक यांनी ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन दिले होते. यात अपंग बांधव यांची ग्रामपंचायत च्या स्व निधीतुन 5% टक्के निधी चे वाटप करणे बंधनकारक असते परंतू आज पर्यंत बलकुवे येथील ग्रामसेवक यांनी सदर निधीचे वाटप केलेले नाही तरी दिनांक 11/12/2020 रोजी प्रशाशक यांना निवेदन देण्यात आले होते परंतु आचार संहिता लागू झाल्याने सदर विषय स्थगीत करण्यात आलेला होता त्यामुळे आज बलकुवे येथील अपंग बांधव यांना निधी चे वाटप लवकर करण्यात यावे या साठी श्री मा सरपंच प्रदीप चव्हाण सर यांना निवेदन देण्यात आले आहे व निधीचे वाटप न केल्यास एक दिवस लाक्षाणीक उपोषण करण्यात येईल तरी त्या ची दखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.त्या मुळे ग्रामपंच्यात स्तरावर अपंग बांधवांना मदत करा अशी विनंती केली असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन चा इशारा देण्यात आला आहे.
Tags
news
